मुंबई, दि. ५ - लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मोठ्ठा धक्का बसण्याची शक्यता आहे. नगरसेवकांपाठोपाठ मनसे (महाराष्ट्र नवनिर्माण सेना ) पक्षाचे राज्यातील एकमेव आमदार शरद सोनावणे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत.
एबीपी माझाच्या वृत्तानुसार, मनसेचे जुन्नर येथील आमदार शरद सोनावणे आज शिवसेनामध्ये प्रवेश करणार आहेत. शरद सोनावणे आपल्या कार्यकर्त्यांसह मातोश्रीवर दाखल झाले आहेत.
जुन्नर तालुक्यातील शिवसैनेच्या कार्यकर्त्यांनी शरद सोनावणे यांच्या पक्षप्रवाशावर तीव्र विरोध दर्शवला आहे. आमची भूमिका ऐकून न घेता शरद सोनावणे यांना उमेदवारी दिली तर तालुक्यातील सर्व पदाधिकारी आपापल्या पदाचा सामूहिक राजीनामा देतील, असा इशाराही दिल्याची चर्चा आहे. २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंच्या बुडत्या नौकेला शरद सोनावणे यांनी वाचवलं होतं. मात्र आता सोनावणे यांनी शिवसेनेचा झेंडा हातात घेत राज ठाकरेंची ती नौकाही बुडण्याच्या मार्गावर आहे.
राजकीय
राज ठाकरेंना धक्का, मनसेचा एकमेव आमदार शिवसेनेच्या गळाला
सात नगरसेवकानंतर एकमेव आमदारही शिवसेनेच्या वाटेवर


