NEWS & EVENTS

सातारा जिल्हा

मुक्ताई चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित जागतिक महिला दिनानिमित्त 'स्त्री कर्तुत्वाचा सन्मान'

33mahanews-logo-min.jpg

सातारा, दि. ७ - निसर्गाने महिलेच्या रूपाने या भूमीला एक वरदान देलेले आहे. 'स्त्री' ने जागतिक पातळीवर आपल्या कार्यकर्तुत्वाचा ठसा उमटवला आहे. मातीपासून सोन पिकवण्याची किमया तिनेच केली आहे. आणि आता तर अवकाशाला गवसणी घालण्याचे मोठे काम महिलांच्या शक्तीने केलेले आहे. प्रतिकूल परिस्थितीत न डगमगता स्वताला, आपल्या प्रपंचाला व आपल्या समाजाला 'मोडला माझा संसार, परंतु मोडला नाही कणा'....या उक्तीप्रमाणे सिद्ध केलेले आहे. म्हणूनच स्त्री जन्मा हि तुझी कहाणी पासून स्त्री हि अबला आहे. असे म्हणायचे धाडसही आज केले जात नाही. इतुके कर्तुत्व पुरुष प्रधान संस्कृतीत स्त्रीने केलेले आहे.

८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त मुक्ताई चॅरिटेबल ट्रस्ट, देगाव ता.साताराच्या संस्थापिका सौ.कांचन सतीश साळुंखे यांनी आपले सामाजिक उत्तरदायित्व प्रत्यक्ष कृती रूपाने साकारण्यासाठी व स्त्री कर्तुत्वाचा सन्मान करण्यासाठी सातारा जिल्ह्यातील विशेषतः सातारा व जावली तालुक्यातील विविध क्षेत्रातील कर्तुत्वान महिलांच्या कार्याचा यथोचित सन्मान करण्याचे नियोजन केले आहे.

या कार्यक्रमात विविध क्षेत्रात लक्षणीय कार्य केलेल्या व प्रसिद्धीपासून दूर असलेल्या १० महिलांचा सन्मान आ.श्री.छ.शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात येणार असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षा कर्तव्य सोशल ग्रुपच्या संस्थापिका छ.सौ.वेदांतिकाराजे भोसले असणार आहेत. तसेच बीड येथील कुटे उद्योग समूहाच्या व्यवस्थापकीय संचालिका सौ.अर्चना कुटे या महिलांना व्यवसायपर मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमास प्राणा फौंडेशनच्या अध्यक्षा डॉ.प्राची पाटील, के.जे.एस कॉलेज पुणेच्या चेअरमन सौ.हर्षदा देशमुख-जाधव, पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, जिल्हा महिला बालविकास अधिकारी सौ.रोहिणी ढवळे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. शुक्रवार दि.८ मार्च रोजी दुपारी २ वाजता सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 'यशवंतराव चव्हाण सभागृहात' हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला असून या कार्यक्रमास सातारा शहर, सातारा व जावळी तालुक्यातील महिला भगिनींनी मोठ्यासंख्येने उपस्थितीत राहून स्त्री कर्तुत्वाचा सन्मान करावा असे आवाहन मुक्ताई चॅरिटेबल ट्रस्टच्या संस्थापिका व सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका सौ.कांचन सतीश साळुंखे यांनी केले आहे.


https://www.youtube.com/embed/