NEWS & EVENTS

राजकीय

नाना पटोलेंनी लढले पाहिजे, माझा त्यांना आशीर्वाद- नितीन गडकरी

काँग्रेसला आपला उमेदवार देण्याचा अधिकार आहे. त्यांनी पक्ष सोडला असला तरी त्यांना माझा आशीर्वाद आहे, असे गडकरी यांनी म्हटले आहे.

35nitin-gadkari-nana-patole-16.jpg

नागपूर, दि. 14- भाजपातून काँग्रेसवासी झालेले माजी खासदार नाना पटोले यांना नागपूर लोकसभा मतदारसंघातून उमदेवारी जाहीर झाली आहे. ते आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधात निवडणूक लढवणार आहेत. दरम्यान, गडकरी यांनी पटोले यांना शुभेच्छा दिल्या असून नानांना आशीर्वाद दिला आहे. नाना पटोले यांनी पक्ष सोडला म्हणून माझा आशीर्वाद संपला, असे नाही. ते तरुण आहेत, त्यांनीही लढले पाहिजे. माझा आशीर्वाद त्यांना आहे, अशी प्रतिक्रिया गडकरी यांनी दिली आहे.

नाना पटोले हे एकेकाळी नितीन गडकरी यांचे सहकारी होती. मधल्या काळात भाजपाबरोबर मतभेद झाल्यानंतर त्यांनी भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील खासदारकीचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. काँग्रेसने आता त्यांना नागपूर लोकसभा मतदारसंघातून नितीन गडकरी यांच्याविरोधात उमदेवारी दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना गडकरी यांनी पटोले यांना शुभेच्छा दिल्या.

काँग्रेसला आपला उमेदवार देण्याचा अधिकार आहे. त्यांनी पक्ष सोडला असला तरी त्यांना माझा आशीर्वाद आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.


https://www.youtube.com/embed/