NEWS & EVENTS

राजकीय

गुजरातमध्ये काँग्रेसच्या अडचणीत वाढ, राष्ट्रवादी सर्व जागा लढणार

आघाडीबाबत सकारात्मक बोलणी झाली नाही तर पुन्हा एकदा काँग्रेसला याचा फटका बसू शकतो.

85sharad-pawar-rahul-gandhi-1244.jpg

अमहदाबाद, दि.29- राष्ट्रवादीने काँग्रेसला पक्षाला मोठा धक्का देत गुजरातमधील सर्व २६ जागा लढवण्याची घोषणा केली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसाठी हा निर्णय घातक ठरू शकतो. कारण मागील निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीची कामगिरी खास राहिलेली नाही. पण यामुळे काँग्रेसची मते विभागली गेली होती. मात्र, दोन्ही पक्षांमध्ये अजूनही आघाडीच्या आशा असल्याचे सांगण्यात येते. कारण नामांकन दाखल करण्याचा अखेरचा दिवस ४ एप्रिल आहे.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पटेल म्हणाले की, राष्ट्रवादी येत्या दोन ते तीन दिवसांत सर्व २६ जागांवरील उमेदवारांची नावे जाहीर करेन. नामांकनाच्या अखेरच्या दिवसासाठी अजून एक आठवडा शिल्लक आहे. जर आघाडीबाबत सकारात्मक बोलणी झाली नाही तर पुन्हा एकदा काँग्रेसला याचा फटका बसू शकतो.

राष्ट्रवादीने जागावाटपानुसार पोरबंदर, पंचमहल आणि गांधीनगर मतदारसंघ मागितला होता. काँग्रेस आणि राष्ट्रवादी दीर्घ कालावधीपासून एकमेकांचे सहकारी आहेत. पण गुजरातमध्ये दोन्ही पक्षांची आघाडी करता आलेली नाही. २००४ आणि २०१४ मधील लोकसभा निवडणुकीपूर्वी दोन्ही पक्षात आघाडी झाली होती. काँग्रेसने २००४ मध्ये राष्ट्रवादीला राजकोट तर २०१४ मध्ये पोरबंदर मतदारसंघ दिला होता. दोन्ही जागांवर राष्ट्रवादीचा पराभव झाला होता.