वाई नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता आजच्या शेवटच्या दिवशी एकूण ३६ अर्ज प्राप्त झाले असून यामध्ये नगराध्यक्षपदासाठी ३ अर्ज तर नगरसेवक पदासाठी ३३ अर्ज प्राप्त झाले आहेत. तर आजपर्यंत एकूण अर्ज १३० झाले असून यामध्ये नगराध्यक्षपदासाठी १२ अर्ज तर नगरसेवक पदासाठी ११८ अर्ज आजपर्यंत झाले आहेत. त्यामुळे लढती काही ठिकाणी तिरंगी तर चौरंगी होण्याची शक्यता व्यक्त होत आहेत. तर निवडणुकीचे रणांगण तापले आहे.
ना. मकरंद पाटील यांची राष्ट्रवादी विरुद्ध लक्ष्मी कराडकर असाच सामना पाचगणीत होणार असून नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीने दिलीप बगाडे यांना पसंती दिली आहे.मात्र,लक्ष्मी कऱ्हाडकर यांचा उमेदवार अद्यापही गुलदस्त्यात आहे.नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केलेल्या कोणत्या उमेदवाराच्या पारड्यात सौ.कऱ्हाडकर आपले वजन टाकतात त्यावरच पाचगणीच्या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. राष्ट्रवादीने २० उमेदवार दिले आहेत तर भाजप , शिवसेना आणि लक्ष्मी कऱ्हाडकर यांचे मात्र एकत्रित राष्ट्रवादीला आव्हान ठरणार आहे.
दरम्यान पाचगणी नगरपरिषदेच्या निवडणुकीकरिता आजच्या शेवटच्या दिवशी अर्ज पुढीलप्रमाणे प्राप्त झाले आहेत. प्रभाग क्र. १ – ‘अ’ नागरिकांचा मागास प्रवर्ग पारस परदेशी, संतोष कदम, प्रभाग क्र. २ – ‘अ’ अनुसूचित जाती महिला सुप्रिया माने, ‘ब’ सर्वसाधारण मधून नरेंद्र बिरामणे, प्रभाग क्र. ३ – ‘अ’ अनुसूचित जाती विवेक परिहार, ‘ब’ सर्वसाधारण (महिला) प्रीती आंब्राळे, प्रभाग क्र. ४ -‘अ’ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला सौ.परवीन मेमन (महिला) ‘ब’ सर्वसाधारण, महेश उपाध्याय, दोन अर्ज भरले. प्रभाग क्र. ५ – ‘अ’ ना. मा. प्र. (महिला), मधून राजश्री प्रभाळे, दुसरा मेघना बाचल, उज्वला महाडिक, ‘ब’ सर्वसाधारण अजित कासुर्डे, प्रभाग क्र. ६ – ‘अ’ सर्वसाधारण (महिला), प्रियंका जायगुडे, साधना कासुर्डे, प्रभाग क्र. ७ – ‘अ’ नागरिकांचा मागास प्र.(महिला) नम्रता बोधे, अनिता चोपडे, दोन अर्ज, ब’ सर्वसाधारण राजेंद्र पार्टे, प्रभाग क्र. ८ – ‘अ’ अनुसूचित जाती, किरण रणपिसे, रविराज ढेकणे, ‘ब’ सर्वसाधारण (महिला) लक्ष्मी कऱ्हाडकर, शाबीरा सय्यद, दोन अर्ज, रीना कांबळे, प्रभाग क्र. ९ – ‘अ’ अनुसूचित जाती (महिला), करुणा काकडे, स्वाती कांबळे, सरोज कांबळे, सुचित्रा आवाडे, ‘ब’ सर्वसाधारण अर्जुन जेधे, प्रभाग क्र. १० – ‘अ’ नागरिकांचा मागास प्रवर्ग दिलावर बागवान, तर नगराध्यक्ष पदासाठी अनुसूचित जाती मध्ये दास चावरिया, दिलीप बगाडे, विजय वन्ने, अर्ज प्राप्त झाले आहेत.
आज भाजपाचे वतीने (१) मेघना बाचल, प्रभाग क्रमांक ५ अ (2) नम्रता बोधे प्रभाग क्रमांक ४ अ आणी ७ब (3) मंगेश उपाध्याय, प्रभाग क्रमांक ४ ब (४) साधना कासुर्डे, प्रभाग क्रमांक ६ अ
शिवसेना शिंदे गट वतीने अर्ज दाखल केले आहेत बी. फॉर्म १)शाबिरा सय्यद, प्रभाग८ ब (2) जॉन जोसेफ प्रभाग ९ (ब)(3) प्रीती अमराळे ,प्रभाग ३ (ब,) (४)संतोष कदम प्रभाग १ (अ)


