NEWS & EVENTS

सातारा जिल्हा

जिल्हा न्यायालयात 17 रोजी लोक न्यायालयाचे आयोजन

90mahanews-logo-min.jpg

सातारा, दि.14 - सातारा जिल्हा न्यायालयात दि.17 मार्च रोजी सकाळी 11 वाजता लोकन्यायालयाचेआयोजन करण्यात आले आहे. यादिवाशी जिल्ह्यात एकूण 11 हजार प्रकरणाची सुनावणी होणार आहे. तक्रारदार, अशीलांनी या संकल्पनेचा जास्तीत जास्त लाभ उठवावा असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश राजेंद्र सावंत यांनी केले आहे.

दि.17 मार्च रोजी जिल्हा न्यायालयात सेच सर्व तालुक्यातील न्यायालयांमध्ये लोकन्यायालयाचे कामकाज चालाणार आहे. सकाळी 11 ते दुपारी 5 वा. कामकाज चालणार आहे. लोकन्यायालयामध्ये प्रामुख्याने धनादेश न वटने, मोटर अपघात,वैवाहिक वाद,बॅक थकीत प्रकरणे यासह इतर अनेक प्रकरणांचा समावेश आहे.

लोकन्यायालयाच्या पॅनलमध्ये तज्ञ न्यायाधिश, विधीज्ञ, प्राध्यापक, सरकारी वकीलअसतात. याशिवाय शासनसकडून न्यायालयात 1 वकील व 2 विधी स्वयंसेवक नियुक्त करण्यात आले असून ते न्यायालयासंबंधी मोफत माहिती, मदत करत असतात. यामुळे लोकन्यायालयाचा जास्तीत जास्त फायदा उठवावा असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव न्या. प्रवीण कुंभोजकर यांनी केले आहे.


https://www.youtube.com/embed/