NEWS & EVENTS

सातारा जिल्हा

'एक मूल एक काटेसावर’ महोत्सवाचे आयोजन

62katesavar-00-696x435.jpg

सातारा, दि. 13 – “एक मूल एक काटेसावर’ महोत्सवाचे सातारा यवतेश्‍वर साईबाबा मंदीराच्या पाठीमागे रविवार दिनांक 17 मार्च रोजी आयोजन करण्यात आले आहे. सह्याद्री देवराई, ट्री स्टोरी फौडेशन, जिल्हा स्त्रीरोग तज्ज्ञ संघटन, काटेसावर संवर्धन समिती सातारा यांच्या पुढाकाराने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती डॉ. श्रीरंग डोईफोडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी डॉ कैलास खडतरे, डॉ, अविनाष भोसले, सह्याद्री देवराईचे मधुकर फल्ले, विजयकुमार निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

या महोत्सवासाठी प्रसिध्द अभिनेते सयाजी शिंदे, पटकथा लेखक अरविंद जगताप तसेच तज्ञ मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यवतेश्‍वर येथे रविवारी सकाळी 10.30 ते 5.00 वा पर्यंत हा महोत्सव सुरू राहणार आहे. यामध्ये चित्रकला, छायाचित्रण स्पर्धा देखील घेण्यात येणार आहेत. या महोत्सवाबाबत बोलताना डॉ. श्रीरंग डोईफोडे म्हणाले, काटेसावर (शाल्मली) हा पानगळी वृक्ष प्रकारातील दणकट बांध्याचे झाड. त्यांच्या राखाडी खोडावर भरपूर काटे असतात. 10 ते 15 मीटर उंच हे झाड वाढते. याचा पर्णसंभार 5 ते 8 मीटर होतो. हिवाळ्याचे चार महिने सोडले तर बाकी सात-आठ महिने मस्त सावली देणारे हे झाड आहे.

भारतामध्ये राजस्थानसह आद्र, पानझडी जंगलात सगळीकडे हे झाड सापडते. सावरीचे लाकूड हे मध्यम टिकाऊ असून पाण्यात लवकर कूजत नाही. यामुळे फर्निचर चहाची खोकी, व लहान होड्या करण्यासाठी याचा वापर केला जातो. कोटेसावराच्या बियापासून तेल काढले जाते याचा उपयोग साबण बनविण्यासाठी होतो. सावरीचा लाल रंगाचा डिंक मोचरस या नावानी ओळखला जातो. तो पाण्यात घातल्यास फुगतो पोकळ व वजनाने हलका असतो. किरकोळ ओली जखम झाली तर वरून हा डिंक लावतात मोचरस तांबडी फुले व सावरीची एक वर्षाच्या आतील मुळै औषधात वापरतात त्याला शीमुळ किंवा मूसळी किंवा शेमल मुसळी म्हणतात. काही आईस्क्रिममध्ये तसेच पुसतकबांधणीसाठी याचा उपयोग होतो असेही त्यांनी सांगितले.

पुढे बोलताना डोईफोडे म्हणाले, कोटेसावरीचे पंचांग मूळ, खोड साल,पान फुले, फळे तसेच डिंकही औषधी व उपयुक्त आहे.स्त्रियांच्या मासिक पाळी, विविध लैगिक समस्या यावर याचा उपयोग करतात तर सुकलेली फुले पंडुरोगावर उपयुक्त आहेत. खोडावरचे कोवळे काटे सुपारीसारखे चघळतात. या फुलातला मकरंद व मांसल पाकळया खायला 40 पेक्षा जास्त पक्षी या झाडावर येतात. त्याशिवाय वानर, माकड, शेकरू, सांबर, भेकर इ. तृणभक्षी प्राणी जंगलात या झाडाची फुले खातात, तसेच रानभाज्यामध्ये या झाडाच्या फुलाची भाजी केली जाते असे ही काटेसावराचे महत्व सांगितले.

काटेसावर हे बहुगूणी झाड आहे. होळीच्या सणाला सरळसोट बांधा असलेले हे झाड तोडण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे या बहुगूणी झाडांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. त्यामुळे जानेवारी महिन्याच्या शेवटाला फेब्रुवारी मार्च महिन्यात निष्पर्णवस्थेत लालचुटूक गुलाबी फुलांचा साज चढवून काटेसावर झाड विविध पक्षांच्या स्वागताला उभे असते. मे महिन्यात या झाडाच्या बिया झाडाखालीच सहज उपलब्ध होतात. पळस, पांगारा, कुक्षी, या स्थानिक देशी झाडाबरोबरीने काटेसावरीच्या बिया गोळा करून मोठया प्रमाणात या झाडाची रोपे तयार करणे ही काळाची गरजे आहे. शहरी भागात या गुलाबी काटेसावरी एवजी पांढरी एवजी पांढरी सावर झाड लावले जाते. त्याएैवजी निसर्गचक्रामध्ये व जैव विवीधतेमध्ये महत्वाची भूमिका बजावणर्या गुलाबी काटेसावरीच्या झाडाचा प्रचार प्रसार व्हावा व वृक्षारोपणामध्ये इतर देशी झाडांसमवेत काटेसावरीचे झाड प्राधान्याने लावावे व देशी झाडांसाठीच संवर्धनशील व्हावे यासाठी काअेसावर महात्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती निंबाळकर यांनी सांगितली.


https://www.youtube.com/embed/