NEWS & EVENTS

कोल्हापूर

जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रवचन आणि दर्शन सोहळयाचे कोल्हापूरमध्ये आयोजन

70narendra-new.jpg

कोल्हापूर, दि. (प्रतिनिधी)- कोल्हापूर जिल्हा जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज भक्त सेवा मंडळाच्यावतीने 25 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता डॉ. डी.वाय.पाटील प्रतिष्ठान कॉलेजचे मैदान, गारगोटी ता.भुदरगड, जि.कोल्हापूर येथे जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांचा प्रवचन आणि दर्शन सोहळयाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी भव्य शोभायात्रा ही काढण्यात येणार आहे. या सोहळयास कोल्हापूर जिल्हयातील भक्तगणांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा भक्त सेवा मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.

जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज नेहमी सांगतात डोळे विज्ञानवादी, मन अध्यात्मवादी आणि बुध्दी वास्तववादी ठेवा. या त्रिसूत्रीने जीवनात सुख, शांती, समाधान, स्थैर्य, प्रगती साधता येईल. अंधश्रध्दा माणसाला अज्ञानाकडे घेऊन जातात. परंतु जी व्यक्ती वरील त्रिसूत्राचा वापर आपल्या जीवनात करतात अशा व्यक्ती जीवनाच्या वाटेवर चालत असताना हताश होताना दिसणार नाहीत. सुखात हुरवाळून जाणार नाहीत वा दुःखात कोलमडून पडणार नाहीत. सुखदुःखात खंबीरपणे जगण्याची उमेद उपासनेमुळे येते. आपण ही या प्रवचन आणि दर्शन सोहळा कार्यक्रमात उपस्थिती लावून अध्यात्मिक शांतीचा अनुभव घ्यावा यासाठी या सोहळयाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रवचन आणि दर्शन सोहळयास उपस्थित राहून आपल्यातील श्रध्दा, उपासनेच्या माध्यमातून गुरुचरणी अर्पण करुन दिव्य, महामंगल आनंदाचा अनुभव घ्या.

कोल्हापूर जिल्हयातील, परिसरातील सर्व शिष्य, साधक, भक्त आणि हितचिंतकांनी प्रवचन आणि दर्शन सोहळयास उपस्थित रहावे तसेच सर्व भक्तांनी गुरुपूजनकरिता गुरुपूजनाचे साहित्य सोबत आणावे, असे आवाहनही जिल्हा भक्त सेवा मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.