पाचगणी : आगामी नगरपरिषदेच्या निवडणुकीत प्रभाग ४ मधून नगरसेवक पदासाठी उभ्या असलेल्या परवीन मेमन यांना स्थानिक नागरिकांचा वाढता प्रतिसाद मिळत असून त्यांच्या उमेदवारीला उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. प्रभागातील विविध वस्ती, परिसर व स्थानिक भागात घेतलेल्या संपर्क अभियानादरम्यान महिलांपासून तरुणांपर्यंत तसेच ज्येष्ठ नागरिकांतही मेमन यांच्या बाजूने सकारात्मक वातावरण पाहायला मिळत आहे. सामाजिक कार्य, सर्वसामान्यांना दिलेली सातत्यपूर्ण मदत, तसेच प्रभागातील मूलभूत सुविधांसाठी सातत्याने केलेले प्रयत्न यामुळे परवीन मेमन यांच्याविषयी नागरिकांमध्ये विश्वास निर्माण झाल्याचे स्थानिकांनी सांगितले. स्वच्छता, पाणीपुरवठा, महिला सक्षमीकरण, रस्ते-विकास, आरोग्य सुविधा आणि युवकांसाठी उपक्रम राबविण्याचे आश्वासन मेमन यांनी आपल्या प्रचारादरम्यान दिले आहे. प्रचाराच्या पहिल्या काही दिवसांतच मेमन यांना मिळणारा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. नागरिकांचा वाढता पाठिंबा लक्षात घेता त्यांच्या उमेदवारीला आणखी गती मिळत असल्याचे जाणकारांचे मत आहे.


