केरळ, दि. ४ - केरळ येथील रॅलीमध्ये जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते तेव्हा श्रोत्यांना मोदींच्या ‘स्लीप ऑफ टंग’चा अनुभव आला. कारण मोदींनी त्यांच्या भाषणात आयुष्मान भारत योजनेचा उल्लेख केला तेव्हा ते कोची या शहराचा उल्लेख करण्याऐवजी कराची असे म्हटले. कराचीतही आयुष्मान भारत योजनेचा लाभ मिळेल असा उल्लेख त्यांनी केल्यावर अनेकांच्या भुवया उंचावल्या. काही क्षणातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपण काय बोलून बसलो हे लक्षात आले मग त्यांनी कराचीऐवजी कोची म्हणायचे होते असे म्हणत भाषण पूर्ण केले.
आयुष्मान भारत या योजनेचा लाभ आपल्या देशात कुठेही मिळू शकतो मग ते कोलकाता असो की कराची असे पंतप्रधान भाषणाच्या ओघात बोलून गेले. मात्र त्यांनी तातडीने आपल्या बोलण्यात बदल करत मला कोलकाता असो की कोची असे म्हणायचे होते असे म्हटले. यावेळी त्यांनी आयुष्मान भारत योजनेचे एक उदाहरणही दिले. एखादा जामनगरचा माणूस समजा भोपाळला गेला असेल आणि तो तिथे आजारी झाला. तर त्याला इलाज करण्यासाठी पुन्हा जामनगरला येण्याची गरज नाही. त्याने फक्त त्याच्याजवळ असलेले आयुष्मान भारत योजनेचे कार्ड सादर करायचे. मग तो कोलकातामधे असो की कराचीमध्ये असे मोदी म्हटले पण त्याच क्षणी त्यांना आपण पाकिस्तानातील कराचीचा उल्लेख केल्याचे लक्षात आले आणि त्यांनी आपण कोलकाता असो की कोची असे म्हणणार होते हे त्यांनी स्पष्ट केले.
सध्याची वेळ अशी आहे की माझ्या मनात शेजारी राष्ट्राचे (पाकिस्तान) विचार येतात. मात्र देशाने जे उत्तर दिले (हवाई हल्ला) ते योग्यच होते असेही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आह.
देश-विदेश
कराचीतही मिळेल ‘आयुष्मान भारत’ योजनेचा लाभ म्हटले मोदी आणि…
आयुष्मान भारत योजनेचा उल्लेख करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जीभ घसरली


