सातारा, दि. ११ - सातारा जिल्ह्यातील सातारा आणि माढा मतदार संघात लोकसभेसाठी दि.२३ एप्रिल रोजी तीसर्या टप्यात मतदान होत आहे. जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदार संघात निवडणुक प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी सातारा जिल्ह्यातील मुख्य २० ठिकाणच्या प्रवेशव्दारावर चेकपोस्ट करण्यात आले आहेत. तसेच येणार्या-जाणार्या सर्व वहानांची कसून तपासणी केली जाणार आहे. जिल्हा पोलीस अभिलेखावरील सातारा जिल्ह्यातील सुमारे ४ हजार समाजकंटकांना नोटीसा बजावून आवश्यकतेतुसार कारवाई केली जाणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी पत्रकार परीषदेत दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमिवर पत्रकार परीषदेचे आयोजन केले होते. यावेळी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, अतिरीक्त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांची उपस्थिती होती.
सातपुते पुढे म्हणाल्या, लोकसभा निवडणुकीची आचार संहिती लागू झाली आहे. त्यादृष्टीने जिल्हा पोलीस दल कामाला लागले आहे. जिल्ह्यातील सातारा आणि माढा या दोन लोकसभा मतदार संघातील निवडणुका शांतेत पार पडाव्यात यासाठी पोलीस दल आणि महसुल यंत्रणेने सयुक्तपणे दक्षता घेतली आहे. पोलीस आणि महसुल कर्मचार्यांची तपासणी पथकेही तयार करण्यात आली आहेत. निवडणुकीत मतदारांना अमिष दाखवण्याचा प्रयत्न केले जातात. अशा प्रकारांना आळा बसावा तसेच यावर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी पोलीस दलाने पथके तयार केली आहेत. ही पथके दोन्ही मतदार संघावर करडी नजर ठेवणार आहेत. निवडणुक काळात प्रत्येक वहानांची काटेकोरपणे तपासणी केली जाणार आहे. यासाठी जिल्ह्यातील २० ठिकाणी प्रमुख रस्त्यांवर नाकाबंदी करून वहानांची तपासणीही सुरू केली आहे. एखाद्या वहानामध्ये आक्षेपार्ह्य बाबी आढळून आल्यास त्या वहानांवर आचार संहितेचा भंग केल्याप्रकरणी कडक कारवाई केली जाणार आहे.
निवडणुक प्रक्रिया शांततेत व निर्भिड वातावरणात पार पडावी यासाठी जिल्हा पोलीस दल सज्ज झाले आहे. मतदारांना मतांसाठी धमकावण्याचे प्रकार होवू शकतात. तसेच मतांसाठी अमिषेही दाखवली जातात. निवडणूक काळात लक्ष ठेवण्यासाठी भरारी पथकांची निर्मिती केली आहे. निवडणुक आयोगाच्या नियमानुसार सर्व हॉटेल धारकांना ११ पर्यंत हॉटेल चालू ठेवण्याची परवानगी दिली आहे. ११ नंतर चालू असणार्या हॉटेलवर कारवाई केली जाणार आहे. मतांसाठी कोणी धमकावणे, दबाव टाकणे अथवा भिती दाखवली तर मतदारांनी तातडीने १०० नंबर या दुध्वनीवर पोलीसांशी तात्काळ संपर्क साधून माहिती कळवावी. म्हणजे पोलीसांना तातडीने अशा लोकांवर कारवाई करता येईल. तसेच समाजानेही जागृत रहाणे गरजेचे आहे. सोशल मिडीयावरून येणारे चुकीचे मेसेज तुम्ही फॉरवड करू नका. अशा मेसेज संदर्भात जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधून माहिती कळवावी. चुकीचे मेसेज तुम्ही फॉरवड केले तर तुमच्यावरदेखील कारवाई होवू शकते याची खबरदारी घ्यावी.
जिल्ह्यात ज्या ठिकाणी अवैध व्यवसाय सुरू आहेत, अशा ठिकाणी कारवाई केली जाणार आहे. निवडणुक काळात कोणी जर मसल पॉवरचा वापर केला आणि त्याच्या विरोधात तक्रार दाखल झाली तर कारवाई करण्याचे आदेश र्सव पोलीस अधिकार्यांना दिले आहेत. जिल्ह्यात ५५ तडीपारची प्रकरणे प्रलंबीत आहेत. निवडणुक मतदानापुर्वी या प्रकरणांचा छडा लावला जाईल. तसेच जिल्ह्यात कोठेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये, निवडणुक गालबोट लागू नये व मतदान प्रक्रीया शांततेत पार पडावी यासाठी जिल्ह्यातील सुमारे ४ हजार समाजकंटकांना नोटीसा बजाविण्याचे काम हाती घेतले आहे. आवश्यकतेनुसार पुढील कारवाई केली जाणार आहे. जनतेनही ही निवडणुक शांततेत पार पडावी यासाठी पोलीस दलाला सहकार्य करावे असे आवाहन पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी शेवटी केले.
राजकीय
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणा सज्ज - तेजस्वी सातपुते
सातारा जिल्ह्यातील ४ हजार समाजकंटकांवर कारवाई होणार


