NEWS & EVENTS

सातारा जिल्हा

कामगार मेळाव्याचा उपक्रम स्तुत्य : सुभाषराव जोशी

21sanman.jpg

कराड, दि. 6 – कामगारांसाठी असलेल्या योजना, उपक्रम व माहिती याबाबत जागृती करण्यासाठी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाने आयोजित केलेला मेळाव्याचा उपक्रम स्तुत्य असून याचा लाभ घेवून कामगारांनी आपले भविष्य उज्ज्वल बनवावे, असे उद्‌गार अर्बन कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी यांनी काढले.

कराड येथील कराड अर्बन बॅंकेच्या शताब्दी सभागृहात महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ (गट कार्यालय, कोल्हापूर) यांच्या वतीने आयोजित कृतिशिल कामगार व आस्थापना प्रतिनिधींचा सन्मान सोहळा व कामगार प्रबोधन मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कराड अर्बन बॅंकेचे अध्यक्ष डॉ. सुभाष एरम, उपाध्यक्ष समीर जोशी, कराड मॅन्युफॅक्‍चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष जितेंद्र जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. दिलीप गुरव, कामगार कल्याण अधिकारी विजय शिंगाडे, कराड अर्बन बॅंकेच्या प्रशासन विभागाचे उप महाव्यवस्थापक महेश वेल्हाळ, ट्रेझरी विभागाचे उप महाव्यवस्थापक सलीम शेख, कराड बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ऍड. भीमराव शिंदे यांच्यासह राज्यातील विविध ठिकाणाहून कामगार, त्यांचे कुटुंबीय, कामगार संघटनेचे नेते, आस्थापना प्रतिनिधी, प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सुभाषराव जोशी म्हणाले, कामगार नेते नारायण मेघाजी लोखंडे यांच्या दूरदृष्टीमुळे आज कामगारांना योग्य तो न्याय मिळत आहे. शासनाने कामगारांसाठी व त्यांच्या कुटुंबियांसाठी विविध कल्याणकारी योजना सुरु केल्या आहेत. या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. कराड अर्बन बॅंक नेहमीच अशा स्वरुपाच्या सामाजिक कार्यात पुढाकार घेत असते. प्रारंभी कामगार नेते नारायण मेघाजी लोखंडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. कामगार कल्याण अधिकारी विजय शिंगाडे यांनी प्रास्ताविक केले.

मेळाव्यामध्ये कामगार कल्याण मंडळाचे कोल्हापूर येथील केंद्र संचालक संघसेन जगतकर यांनी पॉवर पॉईट प्रेझेंटेशनच्या सादरीकणातून कामगार कल्याणच्या विविध योजनांची माहिती दिली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सागरमाळ, कोल्हापूर येथील केंद्र संचालक चंद्रकांत घारगे, इस्लामपूर येथील केंद्र संचालक सचिन खराडे, पुैलेवाडी, कोल्हापूर येथील केंद्र संचालक दीपक गावराखे, केंद्रसेवक विजय खराडे, दीपक मोरे, अभिजित भोई, अर्चना माळी यांनी प्रयत्न केले. सूत्रसंचालन कल्याण निरीक्षक राजेंद्र निकम यांनी केले. संयोजक कामगार कल्याण विभागाचे कराड येथील केंद्रसंचालक संदीप कांबळे यांनी आभार मानले.