सातारा, दि.२७- अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा सातारा जिल्हा प्रेरणा मेळावा व नूतन जिल्हा कार्यकार्णी २०१९-२१ निवड प्रक्रिया नुकतीच रहिमतपूर ता.कोरेगाव. जि.सातारा येथे पार पडली.
या मेळाव्यास राज्य निरीक्षक म्हणून महा अनिस चे राज्य राज्य प्रधान सचिव मिलिंद देशमुख, पुणे व प्रशांत पोतदार सातारा उपस्थित होते. जिल्हा प्रेरणा मेळाव्यामध्ये जी जिल्हा कार्यकारिणी निवडण्यात आली ती खालील प्रमाणे...,
सातारा जिल्हा अध्यक्ष म्हणून डॉ.शंतनू अभ्यंकर, वाई तर उपाध्यक्ष म्हणून विलास भांदिर्गे, तारळे ता.पाटण आणि कार्याध्यक्ष म्हणून प्रशांत जाधव औंध तर प्रधान सचिव म्हणून वंदना माने सातारा यांची एकमताने निवड करण्यात आली. कार्यकारिणीतील विविध विभागांवर पुढील प्रमाणे निवड करण्यात आली. बुवाबाजी संघर्ष विभाग कार्यवाह म्हणून भाग्यवान घाडगे , सातारा , विविध उपक्रम कार्यवाह म्हणून नारायण डफळे, वजरोशी ता. पाटण , वैज्ञानिक जाणीवा प्रकल्प कार्यवाह म्हणून कृष्णा भोसले , रहिमतपूर , वार्तापत्र व्यवस्थापन कार्यवाह म्हणून प्रकाश खटावकर सातारा, प्रकाशन वितरण कार्यवाह म्हणून रामचंद्र रसाळ , सातारा , प्रशिक्षण विभाग कार्यवाह म्हणून दिलीप डोम्बिवलीकर, वाई, महिला सहभाग कार्यवाह म्हणून अमृता जाधव, रहिमतपूर, युवा सहभाग कार्यवाह म्हणून रणवीर गायकवाड, वाई, जातीअंत संकल्प कार्यवाह म्हणून सीताराम माने , रहिमतपूर, मानसमित्र आरोग्य प्रकल्प कार्यवाह म्हणून चंद्रहार माने, रहिमतपूर, सोशल मिडिया व्यवस्थापन कार्यवाह म्हणून प्रभाकर शिंदे तारळे, ता.पाटण, सांस्कृतिक अभिव्यक्ती कार्यवाह म्हणून नामदेव मदने , रहिमतपूर, निधी व्यवस्थापन कार्यवाह म्हणून सीताराम चाळके, कराड, तर कायदे विषयक व्यवस्थापन कार्यवाह म्हणून अॅड.मिलिंद पवार, सातारा यांची एकमताने निवड करण्यात आली.
मेळाव्याच्या अध्यक्ष स्थानी असलेल्या डॉ.शैलाताई दाभोलकर यांनी सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले व पुढील वाटचालीस सदिच्छा दिल्या. जिल्ह्यातील उपस्थित सर्व शाखांनी आपापल्या शाखांचा मागील एक वर्षाचा अहवाल सादर केला.
सर्व नूतन पदाधिका-यांनी सातारा जिल्ह्यात अंधश्रद्धा निर्मूलनाचे हे काम संघटनात्मक दृष्ट्या अधिक विस्तृत व मजबूत करण्याचा निश्चय केला सर्वांनी एकत्रित हातात हात घेऊन हम होंगे कामयाब एक दिन, हे गाणे म्हणून मेळाव्याचा समारोप केला.
सातारा जिल्हा
अंनिस’च्या सातारा जिल्हा कार्याध्यक्षपदी प्रशांत जाधव तर प्रधान सचिव पदी वंदना माने


