इलेक्टोरल बॉण्डसंदर्भातील श्वेतपत्रिका काढण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने इलेक्टोरल बॉण्ड्सचा तपशील 12 मार्चला निवडणूक आयोगाकडे सुपूर्द केला. निवडणूक आयोगाने गुरुवारी संपूर्ण यादी वेबसाईटवर अपलोड केली आहे. राजकीय पक्षांना फंड्स देणाऱ्याची संपूर्ण माहिती आयोगाने आता सार्वजनिक केली आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे यांनी ही मागणी केली आहे.


