सातारा, दि. 16- लोकसभा निवडणुकीसाठी आज बहुजन वंचित आघाडीकडून ३७ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसकडून जागावाटपावर तोडगा न निघाल्यामुळे अखेर वंचित आघाडीकडून ४८ पैकी ३७ उमेदवारीची पहिली यादी जाहीर करण्यात आली. ३७ उमेदवारांच्या या यादीत सर्वाधिक ६ धनगर उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. एकूण २१ विभिन्न जातीच्या उमेदवारांना उमेदवारी दिली आहे. बौद्ध ४, भिल्ल २, माळी २, बंजारा २, मुस्लीम २, कोळी २, कुणबी २, तर वंजारी, माना आदिवासी, वारली, मराठा, आगरी, कैकाडी, मातंग, शिंपी, वडार, लिंगायत, होलार व विश्वकर्मा या जातींच्या प्रत्येकी एका उमेदवाराला संधी देण्यात आली आहे. या यादीमध्ये साताऱ्यातून राष्ट्रवादीचे खा.उदयनराजे भोसले यांच्या विरोधात सहदेव ऐवळे यांना वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी देण्यात आली आहे.
उमेदवारींची नावे –
1. सहदेव ऐवळे-सातारा
2. किरण रोडगे -रामटेक
3. एन.के.नान्हे – भडांरा-गोंदिया
4. रमेश गजबे -गडचिरोली(चिमूर)
5.राजेंद्र महाडोळे-चंद्रपूर
6.प्रवीण पवार -यवतमाळ(वाशीम)
7.बळीराम सिरस्कार -बुलढाणा
8. गुवणंत देवपारे-अमरावती
9.मोहन राठोड-हिंगोली
10.यशपाल भिंगे-नांदेड
11.आलमगीर खान अखिल मोहम्मद खान-परभणी
12.विष्णू जाधव-बीड
13.अर्जुन सलगर-उस्मानाबाद
14.राम गारकर-लातूर
15.अजंली बावीस्कर-जळगाव
16.नितीन कांडेलकर-रावेर
17. शरदचंद्र वानखेडे-जालना
18.सुमन कोळी-रायगड
19.अनिल जाधव-पुणे
20.नवनाथ पडळकर-बारामती
21.विजय मोरे-माढा
22.जयसिंग शेंडगे-सांगली
23.धनराज वंजारी -वर्धा
24.मारूती जोशी-(रत्नागिरी-सिंधुदुर्ग)
25.अरूणा माळी-कोल्हापूर
26.अस्लम बादशाहजी सय्यद-हाताकंगले
27.दाजमल गजमल मोरे-नंदुरबार
28.बापू बर्डे-दिंडोरी
29.पवन पवार-नाशिक
30.सुरेश पडवी-पालघर
31.ए.डी.सावंत-भिवंडी
32.मल्लिकार्जुन पूजारी-ठाणे
33. अनिल कुमार-मुंबई साउथ दक्षिण
34.संजय भोसले-मुंबई साउथ सेन्ट्रल(दक्षिण मध्य)
35.संभाजी शिवाजी काशीद-ईशान्य मुंबई
36.राजाराम पाटील-मावळ
37.अरूण साबळे-शिर्डी
राजकीय
साताऱ्यातून उदयनराजें विरोधात सहदेव ऐवळे यांना उमेदवारी
वंचित बहुजन आघाडीची पहिली यादी जाहीर


