NEWS & EVENTS

राजकीय

सातारा लोकसभा मतदारसंघातील नवमतदारांच्या मनात काय?

73vote.jpg

सातारा, दि. 14 - लोकसभा निवडणुकीसाठी यावेळेस तब्बल जिल्ह्यात २४ लाख ८४ हजार ३९ मतदार असून, यामध्ये १२ लाख ६९ हजार ७०४ पुरुष आणि १२ लाख १४ हजार ३३५ स्त्री मतदारांचा सामावेश आहे. निवडणूक आयोगाने वेळोवेळी घेतलेल्या मतदार नोंदणीत जिल्ह्यात एक लाख ४३ हजार ५४४ नवीन मतदारांची नोंदणी झाली आहे. यामध्ये सातारा लोकसभा मतदारसंघात ९१ हजार ७८५, तर माढा मतदारसंघातील दोन तालुक्‍यांत ५१ हजार ७८९ मतदारांचा समावेश आहे. यामध्ये स्त्री मतदारांची संख्या वाढली असून, जिल्ह्यात ७६ हजार ९३४ स्त्री नवमतदार वाढले आहेत. या वाढलेल्या नवमतदारांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. जिल्ह्यात तृतीयपंथी १७ मतदारांची नोंदणी झालेली आहे.

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर मतदाराचा टक्का वाढविण्यासाठी निवडणूक आयोग व जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यासाठी वेळोवेळी नवीन मतदारांसाठी नोंदणीचे कार्यक्रमही झाले आहेत. सातारा लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांत १८ लाख २३ हजार ४७६ मतदार आहेत. यामध्ये नऊ लाख २८ हजार ६२० पुरुष तर आठ लाख ९४ हजार ८४० स्त्री मतदारांचा समावेश आहे. तृतीयपंथी मतदार १६ आहेत.

यामध्ये विधानसभा मतदारसंघनिहाय पुरुष व (कंसात) स्त्री मतदारसंख्या अनुक्रमे अशी आहे. वाई १,६५,४६० (१,६२,०३५), कोरेगाव १,५१,७४५ (१,४२,९२३), कऱ्हाड उत्तर १,४७,६६०(१,४०,६२४), कऱ्हाड दक्षिण १,४७,७६७ (१,३८,२८७), पाटण १,४९,६३८ (१,४६,६१०), सातारा १,६६,३५०(१,६४,३६१). तृतीयपंथी मतदारांची संख्या वाई दोन, कऱ्हाड उत्तर एक, कऱ्हाड दक्षिण दोन, पाटण तीन, सातारा आठ.

माढा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या फलटण व माण विधानसभा मतदारसंघांत सहा लाख ६० हजार ५६३ मतदार असून, यामध्ये तीन लाख ४१ हजार ०८४ पुरुष तर तीन लाख १९ हजार ४७८ स्त्री मतदारांचा समावेश आहे. मतदारसंघनिहाय पुरुष व (कंसात) स्त्री मतदारांची संख्या अशी आहे. फलटण मतदारसंघात १,६८,२५६ (१,५७,३४६), माण १,७२,८२८ (१,६२,१३२). तर फलटण मतदारसंघात एका तृतीयपंथी मतदाराची नोंद आहे.

२०१४ च्या निवडणुकीत सातारा लोकसभा मतदारसंघात जिल्ह्यात १७ लाख ३१ हजार ६९१ मतदार होते. त्यामध्ये आठ लाख ८६ हजार ५३३ पुरुष तर आठ लाख ४५ हजार १५८ स्त्री मतदारांची संख्या होती. आता २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी सातारा लोकसभा मतदारसंघात एकूण १८ लाख २३ हजार ४७६ मतदार झाले आहेत. यामध्ये नऊ लाख २८ हजार ६२० पुरुष तर आठ लाख ९४ हजार ८५६ स्त्री मतदारांचा समावेश आहे. प्रत्येक वेळी प्रशासन व निवडणूक आयोगाने राबविलेल्या मतदार नोंदणीच्या कार्यक्रमामुळे सातारा लोकसभा मतदारसंघात एकूण ९१ हजार ७८५ मतदार वाढले आहेत. यामध्ये ४२ हजार ०८७ पुरुष तर ४९ हजार ६९८ स्त्री मतदारांचा समावेश आहे. नवमतदार नोंदणीत स्त्रियांची संख्या अधिक आहे.

मतदारसंघनिहाय वाढलेले नवमतदारांमध्ये पुरुष व स्त्रियांची (कंसात) संख्या अशी आहे. वाई ६,७४० (९,१९७), कोरेगाव २,७२६ (३,०८३), कऱ्हाड उत्तर ७,४८५ (७,९७०), कऱ्हाड दक्षिण ५,३९७ (७,३२३), पाटण ८,८१४ (९,५९८), सातारा १०,९२५ (१२,५२७).

फलटणची नवमतदारांत आघाडी
माढा मतदारसंघातील फलटणमध्ये नवमतदार नोंदणीत ५१ हजार ७५९ मतदारांची नोंद झाली असून, यामध्ये २४,५२३ पुरुष तर २७ हजार २३६ स्त्री मतदारांचा समावेश आहे. यामध्ये पुरुष व स्त्री (कंसात) मतदारांची संख्या अशी आहे. फलटण मतदारसंघात ११,०९२ (१३,२१७), माण मतदारसंघात १३,४३१(१४,०१९).


https://www.youtube.com/embed/