NEWS & EVENTS

सातारा जिल्हा

सातारा- नागेवाडी धरणातून पाणी सोडा

बावधनसह बारा वाड्यातील शेतकऱ्यांची मागणी

56nagewadi-1-696x464.jpg

वाई, (प्रतिनिधी)- ५ नागेवाडी धरणातून शेवटचे आवर्तन न सोडल्यास रब्बी हंगाम वाया जाण्याची शक्‍यता शेतकरी वर्गातून वर्तविली जात असून संबंधित विभागाने तात्काळ धरणातून पाणी सोडावे, अशी मागणी बावधनसह 12 वाड्यांमधील शेतकऱ्यांमधून होत आहे.

वाई तालुक्‍यातील मुख्य धरणांपैकी नागेवाडी हे एक धरण आहे. पाव टीएमसी पाणीसाठवण क्षमता असलेल्या या धरणातून बावधनसह 12 वाड्यातील गावांना पाणीपुरवठा होता. साठवण क्षमता कमी असल्याने वर्षभर धरणातून पाणी पुरवठा करताना पाटबंधारे खात्याला तारेवरची कसरत करावी लागते. सध्या परिसरातील पिकांना पाण्याची आवश्‍यकता आहे. त्यामुळे नागेवाडीच्या धरणाच्या कालव्यातून शेवटचे आवर्तन न सोडल्यास रब्बी हंगामातील हाता-तोंडाशी आलेली पिके वाया जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.