सातारा : शाहूनगर वासियांचे अनेक प्रश्न व समस्या आपण मार्गी लावलेल्या आहेत.यापुढेही जनतेसाठी अविरत कार्यरत राहणार असून सातारकरांनी आपल्या घरचा हक्काचा माणूस या नात्याने मला नेहमीच पाठबळ दिले आहे. सातारकरांचे पाठबळ आणि आशीर्वाद हीच माझी ताकद असून आगामी काळात भाजपच्या माध्यमातून सातारकरांच्या सर्व समस्या सोडवून शहराचा कायापालट करू, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय व मित्रपक्ष महायुतीचे सातारा- जावली विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले. भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय व मित्रपक्ष महायुतीचे सातारा लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार श्रीमंत छ. उदयनराजे भोसले आणि सातारा- जावली विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रचारार्थ शहरातील लक्ष्मी टेकडी, लतिफभाई चौधरी घर, सदरबझार पोलीस स्टेशन, बझार पेठ, आमने बंगला, भिमाबाई आंबेडकर झोपडपट्टी, लीलाताई हौसिंग सोसायटी, मुठा गैरेज, हॉटेल ग्रीनफिल्ड, कुबेर विनायक मंदिर, अजिंक्य कॉलनी, रामकृष्ण कॉलनी ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा पोवई नाका या परिसरातून रविवारी सकाळी पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रे दरम्यान मतदारांशी संवाद साधताना शिवेंद्रसिंहराजे बोलत होते.
पदयात्रेत दोन्ही उमेदवारांसह उपनगराध्यक्ष किशोर शिंदे, माजी नगराध्यक्ष निशांत पाटील, शरद गायकवाड, जयेंद्र चव्हाण, अशोक मोने, अमोल मोहिते, धनंजय जांभळे,सुवर्ण पाटील, सिद्धी पवार, शिवसेनेचे बाळासाहेब शिंदे, विशाल जाधव, रजनी जेथे,संदीप साखरे,मिलिंद काकडे,चेतन सोलंकी,संदीप साखरे, स्नेहा नलावडे, विकास धुमाळ, भारती सोळंकी,सुरज सोळंकी, मनोज सोळंकी, गणेश भोसले, राजू राजपूत, बबलू जमादार, विजय साळुंखे, वासिम शेख, राहुल किर्दत, वीर चव्हाण यांच्यासह सर्व आजी माजी नगरसेवक, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.
साताऱ्यातील जनतेच्या हक्काची कामे होण्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील राहिलो आहेत. शाहूनगरवासियांचा रस्त्याचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सत्तेच्या माध्यमातून कायमस्वरूपी सुटणार आहे. याशिवाय इतर सर्व प्रकारची विकासकामे गतीने मार्गी लावणार असून नेहमीप्रमाणे माझ्या पाठीशी सातारकरांनी उभे रहावे, असे आवाहन शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले. शिवेंद्रसिंहराजे आणि उदयनराजे यांच्या माध्यमातूनच सातारा शहराचा विकास झाला आहे. अनेक विकासकामे प्रगतीपथावर असून यापुढे अधिक गतीने आणि मोठमोठी विकासकामे करायची असतील तर भाजप शिवाय पर्याय नाही. त्यामुळेच आपले दोन्ही नेते भाजपमध्ये गेले असून आपण सर्व या दोघांच्याही पाठीशी कायम खंबीरपणे उभे आहोत. आपल्या सातारा शहराचा कायापालट करण्यासाठी दोघांनाही विक्रमी मतांनी विजयी करू, असा निर्धार यावेळी नागरिकांनी बोलून दाखवला.
राजकीय
सातारकारांचा आशीर्वाद हीच माझी ताकद - शिवेंद्रसिंहराजे भोसले
प्रचारात भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांची आघाडी


