NEWS & EVENTS

सातारा जिल्हा

वाई नगरपालिकेच्या निवडणुकीची छाननी प्रक्रिया पूर्ण; १७ अर्ज बाद

शहरात तिरंगी लढतीची चिन्हे

62IMG-20251118-WA0036.jpg

वाई प्रतिनिधी

वाई नगरपालिकेच्या २०२५ २०३० या पंचवार्षिक निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया पूर्ण झाली असून एकूण १७ अर्ज बाद झाले आहेत. ही छाननी नगरपालिका प्रशासकीय इमारतीमध्ये पार पडली. नगराध्यक्षपदासाठी दाखल झालेल्या ९ अर्जांपैकी एक अर्ज बाद झाला असून ८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहेत. नगरसेवकपदासाठी आलेल्या १०५ अर्जांपैकी ८९ अर्ज वैध ठरले आहेत. राजकीय पक्षांचा ‘एबी’ फॉर्म नियोजित मुदतीत जमा न झाल्याने १७ उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी दिली

राजकीय समीकरणे  वाईमध्ये तिरंगीच नव्हे तर चौरंगी लढतीचीही चिन्हे यंदा उमेदवारांची संख्या मोठी असल्याने बंडखोरीची शक्यता कायम आहे. त्यामुळे वाई शहरातील राजकीय लढत तिरंगी की चौरंगी याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

भाजप –अनिल सावंत आघाडीवर 

 

राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले अनिल सावंत हे भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत. वाईतील विविध विकासकामांचा अभ्यास व पूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असताना , मकरंद पाटील यांच्या पाठबळामुळे त्यांनी शहरात मोठा निधी आणल्याची नोंद आहे. त्यामुळे सावंत हे भक्कम उमेदवार मानले जात आहेत पक्षातील काही इच्छुकांची नाराजी आणि बंडखोरीचे वारे असले तरी त्याचा फायदा सावंत यांना होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस – नितीन कदमांची भक्कम तयारी नितीन कदम हे उच्चशिक्षित असून पूर्वी माजी आमदार मदनदादा भोसले यांच्यासोबत काम केले होते. नंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. नगराध्यक्षपदासाठी त्यांनी भक्कम जनसंपर्क आणि संघटन तयार केल्याने तेही या लढतीत केंद्रस्थानी आहेत.

शिवसेना – प्रवीण शिंदे मैदानात 

 

शिवसेनेतून नगराध्यक्षपदासाठी प्रवीण दिनकर शिंदे यांनी उमेदवारी दाखल केली आहे. त्यांच्या काकी पूर्वी वाई नगरपरिषदेच्या नगरसेविका होत्या, तसेच कुटुंबाचा शहरातील राजकीय वारसा मजबूत असल्याने शिंदे हे ही तीव्र संघर्षक्षम उमेदवार मानले जात आहेत.

काँग्रेस – प्रदीप जायगुडे यांचे नेतृत्व

 

राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार प्रदीप जायगुडे हे वाई शहरात नावाजलेले सामाजिक व राजकीय व्यक्तिमत्त्व मानले जाते. त्यांच्या उमेदवारीमुळे काँग्रेसचाही या लढतीत लक्षवेधी सहभाग वाढला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार तेजपाल वाघ हे चित्रपट सृष्टीत मध्ये नावाजलेलं नेतृत्व असल्याने ते टीव्हीच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली आहेत त्यामुळे त्यांचाही या निवडणुकीतील सहभाग महत्त्वाचा मानला जातो त्यामुळे या निवडणुकीला अतिशय चांगल्या प्रकारे रंग चढला आहे 

अपक्षांची एंट्री  लढत चौरंगी होणार

 

अपक्ष उमेदवार विजय ढेकाने आणि दीपक जाधव यांनीही नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला आहे. घटक समीकरणे बदलेल्यास अपक्षांची मते निर्णायक ठरू शकतात राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गट  मकरंद पाटील व भाजपचे  मदन भोसले शिवसेनेचे  विकास  शिंदे रवींद्र भिलारे यांची प्रतिष्ठा पणाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री मकरंद पाटील आणि माजी आमदार मदनदादा भोसले यांच्या गटांची प्रतिष्ठाही या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर पणाला लागली आहे. त्यामुळे निवडणुकीचे राजकीय तापमान अधिक चढले असून वाई  कोणाच्या बाजूने  हा प्रश्न सध्या शहरात चर्चेचा केंद्रबिंदू बनला आहे.                

तिरंगी की चौरंगी  हा प्रश्न अनुत्तरित असला तरी वाई शहरात यंदाची नगराध्यक्षांची लढत अत्यंत कडवी, चुरशीची आणि प्रतिष्ठेची होणार हे मात्र निश्चितच आहे.