NEWS & EVENTS

राजकीय

सातारच्या औद्योगीक क्षेत्रासह टोल नाक्यावरील दहशत मोडून काढणार - नरेंद्र पाटील

48narendra-patil-1.jpg

सातारा, दि.२६- पुणे-साताऱ्यापासून दोन तासांच्या अंतरावर आहे. आज पुणे शहराचा विकास कसा झाला आहे. ते आपण बघत आहे. त्या तुलनेत साताऱ्यातील कारखान्यांची दुरवस्था झाली आहे. शिरवळ मध्ये मोठे उद्योग आले. पण आज एमआयडीसीमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे. त्यामुळे साताऱ्यात उद्योगपती येत नाहीत. आमच्या पक्षाचे उद्योगमंत्री सुभास देसाई यांच्या माध्यमातून आणि पोलिसांच्या सहकार्याने सातारा जिल्ह्यातील औद्योगीक क्षेत्रातील आणि टोल नाक्यावरील दहशत मोडून काढून सातारा जिल्हा दहशतमुक्त करणार असल्याचे शिवसेना भाजप युतीचे उमेदवार व आण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी साताऱ्यात पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी आ.शंभूराज देसाई, शेखर चरेगावकर, नितीन बानूगडे-पाटील, दिपक पवार, महेश शिंदे, रणजितसिह भोसले, चंद्रकांत जाधव, मनोज घोरपडे, महिला पदाधिकारी वर्षा जाधव, युगंधरा साळेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

नरेंद पाटील पुढे म्हणाले, साताऱ्यात कोणाची दहशद आहे. कोण टोल नाक्यावर जाऊन दंगा करत. कोणी बंगल्यावर येऊन राडा केला. कुणावर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले. याची कल्पना जनतेला आहे. मी सांगणे गरजेचे नाही. सातारा ऐतिहासिक जिल्हा आहे. जिल्ह्यातील अनेक प्रश प्रलंबीत आहेत. वीज, शेती पाण्याचा प्रश सुटलेले नाहीत. हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी निवडणूक रिंगणात उतरलो आहे. साताऱ्यातील टोल नाक्यावर सध्या मोठा झोल सुरू आहे. या झोल मधून सातारच्या जनतेला टोल मधून मुक्तच करून टाकणार आहे. पक्षाच्या सर्व सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन काम करणार आहे. पुरुषोत्तम जाधव यांना उमेदवारी मिळाली नाही म्हणून ते नाराज नाहीत. ते आमच्या बरोबरच आहेत. तसेच शिवसेना आमदार शंभूराज देसाई यांच्याशी माझे कसलेही वैयक्तीक मतभेद नाहीत. मराठवाडी धरणाच्या प्रश्नावरून वाद झाला होता. तो आता नाही. तुमच्या उमेदवारीला आ. शिवेंद्रसिंहराजे शुभेच्छा दिल्या का ? या पप्रश्नाला उत्तर देताना पाटील म्हणाले, साताऱ्यात एकत्र बसून आम्ही मिसळ खाल्ली. त्याची चर्चा राज्यभर आहे. त्यामुळे मी यावर अधिक बोलू शकत नाही. मी प्रचार करण्यासाठी कोणत्याही स्टाईल बीलचा वापर करणार नाही. स्टाईल ही टेम्पररी असते, मला पर्मनंट काम करायचे असल्याचा टोला नरेंद्र पाटील यांनी नाव न घेता खा. उदयनराजेंच्या स्टाईलची खिल्ली उडवली.

आमदार शंभूराज देसाई म्हणाले, युतीचा उमेदवार म्हणून नरेंद्र पाटील यांना उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी दिली आहे. आम्ही दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते निवडणूकिला एकत्र सामोरे जात आहे. दोन्ही पक्षाचे पदाधिकारी प्रामाणिकपणे काम करून सेनेचा खासदार म्हणून नरेंद्र पाटील यांना निवडून आणले जाणार आहे. पाटण तालुक्यातुन किती मताधिक्य देणार या प्रश्नाला उत्तर देताना, शंभूराज देसाई म्हणाले, निवडणूकित दिसेल. मी आता यावर बोलणार नाही. पुरूषोत्तम जाधव म्हणाले, उमेदवारीसाठी मी शिवसेनेत प्रवेश केला होता. उद्धव ठाकरे यांनी मला उमेदवारी मिळाली नाही म्हणून मी नाराज नाही. मी पक्षाचे उमेदवार नरेंद्र पाटील यांना निवडुन आणण्यासाठी काम करणार आहे. १९९६ ची पुरावृत्ती पुन्हा एकदा सातारा जिल्ह्यात झालेली पहायला मिळणार आहे.