पाचगणी/ प्रतिनिधी
पाचगणी या पर्यटन स्थळावरील सर्व प्रश्न मला ज्ञात आहेत. अगदी टेबल लँड ते टॅक्सी युनियन पर्यंत सर्व प्रश्नासाठी मी धडपडलो आहे. पर्यटन स्थळावरील सर्व प्रश्न केंद्राशी निगडित आहेत त्यामुळे आपल्या प्रश्नासाठी आपल्या भेटणारा माणूस दिल्लीला पाठवण्याची गरज आहे नाहीतर काही लोकांकडे गेल्यावर भेटायला जावं की नाही असा प्रश्न पडतो असा टोला नाव न घेता उदयनराजे भोसले यांचेवर शशिकांत शिंदे यांनी लगावला.
पांचगणी (तालुका महाबळेश्वर) येथे पर्यटन स्थळावरील नागरिकांशी संवाद साधण्यासाठी शशिकांत शिंदे आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा सरचिटणीस गणेश दानवले, माजी नगराध्यक्ष नानासाहेब कासूर्डे, शेखर कासूर्डे , अनिता चोपडे, चंद्रकांत माने, दत्ता दुधाने, आबा मालुसरे, बापू बिरामने, प्रवीण बोधे, गॅब्रियल फर्नांडिस, रुपेश बगाडे, सुनिल बगाडे, जगन्नाथ शिंदे, तुकाराम मालुसरे, तुकाराम घाडगे, अनिल बोधे, संजय कासूर्डे , निसार सय्यद, भीमराव दानवले, विठ्ठल गोळे, संतोष गोळे , संजय राजपुरे, अक्षय दानवले ,अजित दानवले, लक्ष्मण पार्टे, यशवंत पार्टे, सुनिल पार्टे, आनंदा पार्टे, उदय पार्टे, विजय पार्टे, लक्ष्मण भिलारे, प्रकाश शेलार, लक्ष्मण पार्टे, प्रकाश जाधव आदी नागरिक उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले आज मी इतक्या वर्षांनी आलो तरी लोकांचे प्रेम कायम आहे. ऋणानुबंध , आपलेपणा आणि जिव्हाळा निर्माण होती तो आज टिकून आहे याचा आनंद वाटतो असे सांगून शिंदे पुढे म्हणाले दहा वर्षांमध्ये हळूहळू लोकांच व्यक्ती स्वातंत्र काढून घेतले जात असताना जिझिया कर लादले जात आहेत. जी ऐस टी सारखी लूट होत असताना अधिकार गाजवण्याचा प्रयत्न होत आहे तरी सुद्धा आपण सार सहन करतो. वेगवेगळे निर्णय घेताना, कायदे करताना काही लोकांचा आत्मविश्वास एवढा वाढत जातो आम्ही काहीही केलं तरी कोण काही करत नाही असा न्यूनगंड निर्माण होत आहे.
संघर्षा शिवाय नेतृत्व उभ राहत नाही ते तुम्हीच उभ केल आहे.आपल्या स्वातंत्र्याच्या वर घाला घालण्याचा प्रयत्न होत असेल , जिल्ह्याचे विकासाचे व्हिजन नसेल, महाराष्ट्राच्या स्वाभिमान कुठेतरी उभा करायचा असेल तर ही लढाई लढविच लागेल. मी खात्री देवून सांगतो केंद्रात त्यांना बहुमत मिळत नाही. पण 24 नंतर निवडणुका होतील की नाही , संविधान राहील की नाही याची खात्री वाटत नाही. असेही यावेळी शिंदे यांनी सांगितले. त्यानंतर माजी नगराध्यक्षा सौ लक्ष्मी कऱ्हाडकर यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेवून चर्चा केली. यावेळी शिंदे यांचा पाचगणीच्या नागरिकांनी भव्य असा सत्कार केला.


