मुंबई, दि. 13 राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे सुपूत्र पार्थ पवार यांच्या मावळ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीवर शरद पवार यांनी अद्याप शिक्कामोर्तब केलेले नाही. त्यामुळे मावळच्या उमेदवारीबद्दल सस्पेन्स अजून कायम आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातील बूथप्रमुखांबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.
त्यावेळी मावळ मतदार संघातून आलेल्या एका कार्यकर्त्याने पार्थ पवार यांना १०० टक्के निवडून आणण्यासाठी मेहनत घेणार आहोत असे शरद पवार यांना सांगितले. त्यावर पवार यांनी उमेदवार कोण याची यादी दोन तीन दिवसात अध्यक्ष जाहीर करतील. पार्थ पवार यांचे नाव त्यांनी घेतले नाही. तुम्ही पक्षाच्या उमेदवारांची काळजी घेऊ असे नागरिकांना सांगा असे पवार यांनी सांगितले.
मावळ लोकसभेच्या उमेदवारीवर शरद पवार यांनी गुगली टाकली आहे. शरद पवार म्हणाले की, सोशल मीडियावर जास्तीत जास्त भर दिला पाहिजे. खोटी बातमी आल्यानंतर खोडली पाहिजे. त्याला सोशल मीडियातून उत्तर दिलं गेलं पाहिजे. हे सर्व करत असताना कायद्याच्या चौकटीत राहूनच करावं. याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. नवीन पिढीचा सोशल मिडियाकडे भर आहे असे देखील पवार म्हणाले.
अजित पवार यांच्या पुत्रासाठी माढा मतदारसंघातून निवडणूक लढविणार नाही असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी जाहीर केले. त्यानंतर मावळमधून पार्थ यांच्या उमेदवारीची चर्चा सुरु झाली. पार्थ पवार यांना मावळ लोकसभा मतदार संघातून उमेदवारी देण्याचे संकेत दिल्यानंतर पार्थ यांनी आज एकविरा देवीचे दर्शन घेतले. ते सध्या मावळ परिसरात स्थानिक नेत्यांच्या गाठीभेटी घेत असून एक प्रकारे प्रचार सुरू केला आहे.
राजकीय
शरद पवार यांची मावळ लोकसभेच्या उमेदवारीवर ‘गुगली’
अजित पवार यांचे सुपूत्र पार्थ पवार यांच्या मावळ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीवर शरद पवार यांनी अद्याप शिक्कामोर्तब केलेले नाही


