मुंबई - पक्षांतर्गत धुसफूस थांबवण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आता सर्व सूत्रे हातात घेतली आहेत. शरद पवार यांनी मुंबई येथे आयोजित केलेल्या बैठकीमध्ये सातार्याचे खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले व आमदार श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यात दिलजमाई झाली असून श्री. छ. उदयनराजेच सातार्यातून राष्ट्रवादीचे लोकसभेचे उमेदवार असल्याचे निश्चित करण्यात आले आहे.
नेत्यांमधील विसंवाद दूर करण्यासाठी शरद पवार यांनी मुंबई येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यासाठी खासदार श्री. छ. उदयनराजे व आमदार श्री. छ. शिवेंद्रराजे यांच्यासह पक्षातील वरीष्ठ नेते उपस्थित होते. यावेळी श्री. छ. उदयनराजे व श्री. छ. शिवेंद्रराजे यांचे मनोमिलन करण्यात शरद पवार यांना यश आले.
एकदिलाने निवडणूक लढवण्यास श्री. छ. उदयनराजे व श्री. छ. शिवेंद्रराजे तयार झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या बैठकीला अजित पवार, जयंत पाटील, रामराजे नाईक निंबाळकर, दिलपी वळसे पाटील व राष्ट्रवादीचे अन्य वरिष्ठ नेते उपस्थित होते.
सर्व वाद बाजूला ठेवून पक्षासाठी काम करावं असा सल्ला शरद पवार यांनी यावेळी दिला.
राजकीय
सातार्यातून श्री. छ. उदयनराजेच राष्ट्रवादीचे उमेदवार
साताऱ्यातील दोन राजेंची दिलजमाई, पवारांच्या मध्यस्थीने श्री. छ. उदयनराजे- श्री. छ. शिवेंद्रराजेंचं मनोमिलन


