अभिनेत्री कंगना रणौत ही नेहमीच आपल्या रोखठोक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहे. एका मुलाखतीत तिनं निर्माते-दिग्दर्शक आणि सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांच्याबद्दल धक्कादायक खुलासा केला. फोटोशूटसाठी मला त्यांनी रोब (पारदर्शक गाऊन) घालायला दिला होता. अंतर्वस्त्र परिधान न करता फक्त रोबवर त्यांनी मला फोटोशूट करायला सांगितलं होतं असं कंगना म्हणाली यावर पहलाज निलहानी यांनी उत्तर दिलं आहे. कंगनानं माझ्या वाकड्यात शिरू नये माझ्याजवळ अशा बऱ्याच गोष्टी सांगण्यासारख्या आहेत असा धमकीवजा इशारा त्यांनी कंगनाला दिला आहे.
एका मुलाखतीत कंगनानं पहलाज निलहानीबद्दल धक्कादायक खुलासा केला .पहलाज निहलानी यांनी मला त्यांच्या एका चित्रपटाची ऑफर दिली होती. ‘आय लव्ह यू बॉय’ असं त्या चित्रपटाचं नाव असून त्यासाठी फोटोशूट होणार होतं. फोटोशूटसाठी मला त्यांनी रोब (पारदर्शक गाऊन) घालायला दिला होता. अंतर्वस्त्र परिधान न करता फक्त रोबवर त्यांनी मला फोटोशूट करायला सांगितलं होतं. या चित्रपटात मी एका मुलीची भूमिका साकारणार होती, जिच्या मनात तिच्या बॉसविषयी लैंगिक भावना आहेत. ती एक सॉफ्ट पॉर्न भूमिका होती असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. हे सगळं ऐकूनच मी हे काम करू शकत नाही असं सांगितलं आणि तिथून अक्षरश: पळ काढला. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण त्यानंतर मी काही दिवस सगळ्यांपासून लांब राहत होती. मी माझा नंबरदेखील बदलला होता,’ असं ती म्हणाली.
या आरोपांनंतर पहलाज यांनी कंगनाला धमकीवजा इशारा दिला आहे. तिने माझ्या वाकड्यात शिरू नये नाहीतर माझ्याकडे तिच्याविषयी सांगायला बऱ्याच गोष्टी आहेत. या फोटोशूटसाठी मी दीड कोटी खर्च केले होते. तिला महेश भट्ट यांच्या गँगस्टर चित्रपटात काम करायचं होतं म्हणून तिने चित्रपटाला नकार दिला. कंगनानं या चित्रपटाला सॉफ्ट पॉर्न म्हटलं आहे. मात्र या चित्रपटासाठी मी अमिताभ बच्चन यांनादेखील विचारलं होतं. अमिताभ बच्चन यांनी ‘चिनी कम’ हा चित्रपट तेव्हा केला होता म्हणून त्यांनी नकार दिला असंही ते म्हणाले.
Entertainment
कंगनाने माझ्या वाकड्यात शिरू नये, आरोपांनंतर निहलानींचा धमकीवजा इशारा


