NEWS & EVENTS

Entertainment

श्रद्धा कपूरमुळे चर्चेत आलेला रोहन श्रेष्ठा आहे तरी कोण?

रोहनदेखील बॉलिवूडमधील लोकप्रिय फोटोग्राफरपैकी एक आहे.

49sharddha-and-rohan-.jpg

बॉलिवूडमध्ये गेल्या वर्षभरात अनेक सिलिब्रिटी जोडींनी लग्नगाठ बांधली. त्यानंतर आता या नवीन वर्षातदेखील मलायका-अर्जुन, शिबानी दांडेकर-फरहान अख्तर या जोड्या लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यातच अभिनेत्री श्रद्धा कपूरदेखील प्रियकरासोबत लवकरच लग्न करणार असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र वडील शक्ती कपूर यांनी हे वृत्त फेटाळून लावलं आहे. श्रद्धा या वर्षाच्या अखेरपर्यंत रोहन श्रेष्ठासोबत लग्न करण्याची चर्चा रंगत असून हा रोहन नक्की आहे तरी कोण असा प्रश्न साऱ्यांनाच पडला आहे. चला तर मग जाणून घेऊयात रोहन श्रेष्ठाविषयी –

रोहन श्रेष्ठा हा बॉलिवूडचे प्रसिद्ध फोटोग्राफर राकेश श्रेष्ठा यांचा मुलगा असून आपल्या वडीलांप्रमाणेच त्यानेदेखील याच क्षेत्राची निवड केली आहे. रोहनने न्युयॉर्क अॅकॅडमी येथे आपलं संपूर्ण शिक्षण पूर्ण केलं आहे. विशेष म्हणजे वडीलांप्रमाणेच रोहनदेखील बॉलिवूडमधील लोकप्रिय फोटोग्राफरपैकी एक आहे.
आतापर्यंत अनेक प्रसिद्ध मॅगझीन, काही ब्रॅण्डसाठी त्याने काम केलं आहे. करिना,रणबीर, रणवीर, परिणीती आणि शाहरुख खान यासारख्या दिग्गज कलाकारांचं फोटोशूट केलं आहे.

रोहनचा जन्म ६ मार्च १९८५ साली मुंबईमध्ये नेपाळी कुटुंबात झाला. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर रोहन पुढील शिक्षणासाठी न्युयॉर्कला रवाना झाला होता. हे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर काही काळ त्याने आपल्या वडीलांना असिस्ट केलं होतं. २००९ साली त्याने स्वतंत्रपणे त्याच्या कामाला सुरुवात केली.
अभिनेता रणबीर कपूरच्या फोटोशूटपासून रोहनने त्याच्या कामाचा श्रीगणेशा केला होता. विशेष म्हणजे राकेश यांनीदेखील त्यांच्या करिअरच्या सुरुवातीला रणबीरची आई नितू कपूर यांचं फोटोशूट करुन केली होती.

बॉलिवूडचा ‘गली बॉय’ अर्थात रणवीर सिंह रोहनचा बालपणीचा मित्र असून आजही त्यांच्यातली मैत्री कायम आहे. सध्या पाहायला गेलं तर रोहनची चर्चा त्याच्या कामापेक्षा श्रद्धासोबत असलेल्या अफेअरवरुन जास्त रंगल्याचं पाहायला मिळत आहे.