NEWS & EVENTS

सातारा जिल्हा

श्री उत्तर चिदंबरम नटराज मंदिरात महाशिवरात्रीच्या पर्वकाळी हवन

संपूर्ण देशात सुखशांतता नांदावी यासाठी प्रार्थना

904--natraj1-min.jpg

सातारा, दि. 4- कांची कामकोटी पीठाचे महास्वामी प.पू.शंकराचार्य चंद्रशेखरेंद्र सरस्वती तसेच प.पू. जयेंद्र सरस्वती व त्यांचे परमशिष्य प.पू.शंकरविजयेंद्र सरस्वती यांच्या शुभाशिर्वादाने सातारा येथे साकारण्यात आलेल्या प्रसिध्द अशा श्री उत्तर चिदंबरम नटराज मंदिरात दरवर्षीप्रमाणे आजही महाशिवरात्री महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला.

आज सकाळी 6 वाजता लघुन्यास,एकादश रुद्र जप , लघुरुद्र होत व पुर्णाहूती महामंगल आरती,कलशयात्रा, श्री मुलनाथेश्‍वर पिंडीस कलश महाअभिषेक,अलंकार,नेैवद्य,आरती व प्रसाद वितरण होउन रात्री साडेआठ ते अकरा या वेळेत मंदिरात कलशस्थापना,लघुरुद्र जप,श्री नटराज पाचू पिंडीस कलशाभिषेक करण्यात आला.तसेच महाशिवरात्री निमित्त रात्री 12 वाजेपयर्ंंत मंदीर दर्शनासाठी खुले ठेवण्यात आले होते.

कालपासून मंदिरात महाशिवरात्री निमित्त सुरु असलेल्या लघुरुद्राची हवनाद्वारे पूणूहूती दुपारी संपन्न झाली. या हवनाबद्दल माहिती देताना वेदमुर्ती दत्ताशास्त्री जोशी म्हणाले की, सध्या देशात माजलेली अराजकता, परराष्ट्राचे होणारे दहशतवादी हल्ले थांबावेत, संपूर्ण देशात सुखशांतता नांदावी, शत्रूंची बुध्दी ज्यामुळे हिंसकता वाढत आहे ती नाश पावावी. दुष्काळाचे संकट दूर होवून सर्वत्र संपन्नता यावी. सर्वाच्या मंगल कल्याणार्थ संकल्प सोडून देशात सुख समृध्दी व आनंद निर्माण व्हावा यासाठी महाशिवरात्रीच्या पर्वकाळी हे हवन संपन्न झाले.

यामध्ये आज पूर्णाहूती मंदिराचे व्यवस्थापकिय विश्‍वस्त रमेश शानभाग व सौ उषा शानभाग यांचे हस्ते करण्यात आली. याचे पौरोहित्य वेदमूर्ति दत्ता शास्त्री जोशी यांनी केले. तसेच या धार्मीक कार्यक्रमात हवनासाठी सातारा येथील वेदमुर्ती श्रीकृष्णशास्त्री जोशी, अनिरूध्द उमासे, यज्ञेश्‍वरशास्त्री जोशी, हरीरामशास्त्री जोशी, हणमंत बोरीकर, चंद्रमौळेश्‍वर शास्त्री जोशी, संकेत पुजारीख, सुशांत शेवडे, रोहित जोशी, आदित्य कुलकर्णी, श्रेयस भिसे हे ब्रह्मवृंद सहभागी झाले होते.

याचवेळी मंदिरात स्वरसाधना संगीत विद्यालयाच्या गुरू स्व.साधनाताई जोशी यांच्या शिष्यांनी शास्त्रीय गायन सादर केले. यामध्ये यश कोल्हापूरे याने तोडीरागात बडाख्याल, छोटा ख्याल व तराणा सादर केला. सौ.उषा शानभाग यांनी भैरवरागात बडाख्याल, छोटाख्यात सादर करून यात बिना हर कौन खबर लेत ही बंदीश सादर केली तर जौनपुरीमध्ये अवघे गरजे पंढरपूरे मराठीतील अभंग अणि कानडी भाषेतील नटराज निन्नरमवाडू हे भजन सादर केले. डॉ.सौ.संगीता कोल्हापूरे यांनी बैरागी राग,, सौ उज्ज्वला नानल यांनी मधूमाद सारंग आणि सौ.शुभदा लाटकर यांनी अहिरभैरव राग सादर केला. हवन आणि गायनाचे वेळी अनेक मान्यवर चित्रकारांनी मंदिर परिसरात बसून आकर्षक चित्रे रेखाटली यावेळी विश्‍वस्त मुकुंद मोघे,के.नारायण राव,रणजीत सावंत,व्यवस्थापक चंद्रन आदी उपस्थित होते.

मंदिरात खास महाशिवरात्री साठी बनवलेल्या साडेचार फुट संगमरवरी शिवलिंगाचे दर्शनासाठी सातारकर भावीकांनी मोठी गर्दी केली होती.मंदिरातील श्री मूलनाथेश्‍वराचे नजीक विशेष मंचावर हे शिवलिंग विविध रंगी विद्युत झोतात पहाण्यासाठी आकर्षंक सजावटीने ठेवण्यात आले होते. रात्री उशिरापर्यंत भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावून मंदिरात गर्दी केली होती.