महाबळेश्वर : शहरातील मतदानाची टक्केवारी वाढावी आणि जास्तीत जास्त नागरिकांनी आपला राष्ट्रीय हक्क बजावावा या उदात्त हेतूने, पाचगणी शहरातील प्रतिष्ठित व्यावसायिक संस्था 'श्री कृष्ण ज्वेलर्स'ने एक अत्यंत स्तुत्य आणि आकर्षक उपक्रम हाती घेतला आहे. मतदारांना सक्रिय सहभागासाठी प्रोत्साहित करण्यासाठी, ज्वेलर्सने सोने आणि चांदीच्या खरेदीच्या घडणावळीवर तब्बल ५०% सूट जाहीर केली आहे. या अनोख्या उपक्रमाची माहिती देताना श्री कृष्ण ज्वेलर्सचे मालक तेजस ओझरकर आणि श्रेयस ओझरकर यांनी सांगितले की, लोकशाहीमध्ये प्रत्येक मताला मोठे महत्त्व आहे आणि नागरिक मोठ्या संख्येने मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावेत यासाठी त्यांनी हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.2 डिसेंबर रोजी वाई आणि पाचगणी नगरपालिका निवडणूकीवेळी देखील श्रीकृष्ण ज्वेलर्स ने ही योजना आणली होती.या योजनेला मतदारांनी भरघोस प्रतिसाद दिल्यानेच ओझरकर बंधूनी ही योजना मश्वर नगरपालिका अंतर्गत येणाऱ्या मतदारांसाठी पुन्हा सुरू केली.
सोने-चांदीच्या घडणावळीवर तब्बल ५०% सूट जाहीर; मतदारांना प्रोत्साहित करण्यासाठी उचलले 'आकर्षक' पाऊल
५०% थेट सवलत: मतदारांना सोने आणि चांदीच्या दागिन्यांच्या खरेदीवर लागणाऱ्या घडणावळीवर ५०% थेट सवलत (सूट) मिळणार आहे.
आकर्षक भेट वस्तूः याशिवाय, मतदान करून आलेल्या प्रत्येक ग्राहकाला प्रत्येक खरेदीच्या घडणावळीवर एक आकर्षक भेट वस्तू देखील दिली जाणार आहे. श्री कृष्ण ज्वेलर्सच्या या आगळ्यावेगळ्या प्रयत्नामुळे मतदारांना केवळ आपला हक्क बजावण्यासाठी प्रेरणा मिळेल, असे नाही, तर सवलतीच्या दरात दागिने खरेदी श्री कृष्ण ज्वेलर्सच्या या आगळ्यावेगळ्या प्रयत्नामुळे मतदारांना केवळ आपला हक्क बजावण्यासाठी प्रेरणा मिळेल, असे नाही, तर सवलतीच्या दरात दागिने खरेदी करण्याची एक सुवर्णसंधी देखील मिळणार आहे.
मतदारांना प्रोत्साहित करण्यासाठी व्यावसायिक प्रतिष्ठानांनी उचललेले हे एक महत्त्वपूर्ण आणि अनुकरणीय पाऊल म्हणून पाहिले जात आहे.


