गोंदवले,दि.२६ – पाणी फाउंडेशन ही आईच्या भूमिकेत असून त्या काळ्या आईचं ऋण फेडणे आपलं कर्तव्य आहे. यासाठी, गावकरी एक झाले की आपोआप गाव एक होतोय आणि गाव एक झाला की श्रमदानातून पाणीदार होतोय, असे प्रतिपादन पाणी फाउंडेशनचे महाराष्ट्राचे समन्वयक डॉ. अविनाश पोळ यांनी गोंदवले खुर्द येतील महा ग्रामसभेत केले.
पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून वॉटर कप 2019च्या निमित्ताने येणाऱ्या 45 दिवसांमध्ये करण्यात येणाऱ्या कामांच्या नियोजनासाठी गोंदवले खुर्दमध्ये मारुती मंदिरासमोर गावाची महा ग्रामसभा आयोजित केली होती. या सभेला गावातून सुमारे दीड हजार मुले-मुली, महिला पुरुष जमा झाले होते.
सभेला विशेष मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र समन्वयक डॉ. अविनाश पोळ, चला हवा येऊ द्या मालिकेतील कलाकार भारत गणेशपुरे, मंत्रालयातील उपसचिव डॉ. नामदेव भोसले, बाळासो शिंदे, अजित पवार, यांच्यासह गावातील सर्व संस्थांचे पदाधिकारी, संचालक, ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका, शिक्षक, आरोग्य कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी डॉ. पोळ म्हणाले, या काळ्या आईने आपल्याला खूप भरभरून दिले. तिची तहान भागवणे आपलं कर्तव्य आहे. सध्या थर्टी फर्स्ट, व्हॅलेंटाईन डे अशी नवनवीन फॅड निघाली आहेत. त्यामुळै भावी पिढी व्यसनी होऊ लागली आहे. म्हणून मी 2004 साली माझ्या गावच्या परिसरात असणाऱ्या सुमारे 67 गावातील युवकांना एकत्र करून अशा महत्वाच्या दिवशी गावातील मंदिरे रस्ते धुवून काढणे, अशी शक्य असणारी कामे करायाला सुरुवात केली. त्यानंतर निश्चय करून अजिंक्यतारा किल्ल्यावर श्रमदान सुरू केले. यामुळे किल्ला स्वच्छ झाला. किल्ल्यावर पाणी आडलं आणि श्रमदान करणाऱ्या लोकांच्या शरीराची चांगल्या प्रकारे निगा राखली गेली.
मी स्वतः 365 दिवस श्रमदान केलेला माणूस आहे. आपण श्रमदानातून खूप काही मिळवू शकतो. मन आणि शरीर सुदृढ राहत आहे. पाणी फाउंडेशन काय पैसे घेऊन आले नाही. पाणी फाउंडेशन ज्ञान घेऊन आले आहे. कारण पैसे चिरंतन टिकत नाही म्हणून ज्ञान महत्वाचे आहे. माणूस एकत्र आल्यावर सगळं शक्य असते.
आषाढी वारीत कोणताही गोंधळ धिंगाणा ना बंदोबस्त असतो. कारण प्रत्येकजण मनाने एक झालेला असतो. आपण ही एकत्र येऊन श्रमाची चळवळ सुरू करायची आहे. गावातील सगळ्यांनी श्रमदान केले तर खूप पाणी आडू शकत. फक्त आपण मनावर घेतलं पाहिजे. आज असणारी उपस्थिती पाहता आपण श्रमदानाला पण अशीच उपस्थिती लावली तर आपल्या गावाचा पाणलोटची वाढ होण्यास वेळ लागणार नाही. सगळ्यांनी एकत्र राहा याच शुभेच्छा आहेत. यानंतर नामदेव भोसले बाळासो शिंदे यांनी आपली मनोगते व्यक्त केली. दरम्यान, चला हवा येऊ द्या फेम भारत गणेशपुरे यांनी लोकांना खूप मोलाच मार्गदर्शन करत लोकांना आजच्या दुष्काळी परिस्थितीची जाणीव करून देत असत एकत्र राहून मोठ्या प्रमाणात काम करून आपला पाणलोट वाढवा असे आवाहन त्यांनी केले.
सातारा जिल्हा
काळ्या आईचं ऋण फेडण्यासाठी गाव पाणीदार करा
डॉ. अविनाश पोळ : गोंदवले खुर्द 2019 वॉटर कपसाठी महाग्रामसभा


