NEWS & EVENTS

राजकीय

आचारसंहितेचे उल्लंघन करणा-यांवर कठोर कारवाई - जिल्हाधिकारी

सातारा लोकसभेसाठी ८ एप्रिल अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस

88election-press.jpg

सातारा.दि.११- केंद्रीय निवडणूक आयोगाने सार्वत्रिक लोकसभा निवडणूक-2019 चा कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमानुसार निवडणूक अधिसूचना प्रसिद्ध गुरुवार दि. 28 मार्च 2019 रोजी करण्यात येणार आहे. नामनिर्देशन पत्रे सादर करण्याचा अंतिम दिनांक गुरुवार 4 एप्रिल 2019, नामनिर्देशन पत्रे छाननी शुक्रवार दि. 5 एप्रिल रोजी करण्यात येणार आहे. तसेच उमेदवारांनी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक सोमवार दि. 8 एप्रिल 2019 असा असणार आहे. मंगळवार दि.23 एप्रिल 2019 रोजी मतदार होणार आहे व मतमोजणी गुरुवार दि. 23 मे 2019 रोजी होणार आहे. तसेच निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा दिनांक 27 मे 2019 असा असणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्वेता सिंघल यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

आचार संहितेच्या अनुषंगाने सर्व शासकीय संपत्तीच्या भिंतीवरील लेखन, पोस्टर्स, पेपर्स, कटआऊट, होर्डीग, बॅर्नस, झेंडे काढून टाकण्याबाबत कार्यवाही करण्यात आली आहे. तसेच खासगी संपत्तीवरील सर्व अनधिकृत राजकीय जाहिराती निवडणूक जाहिर झाल्यापासून काढून टाकण्याची कार्यवाही त्वरीत करण्यात आली आहे. राजकीय पक्ष, उमेदवार किंवा अन्य निवडणुकांचा प्रचार, प्रसार अथवा निवडणुकीसंबंधी कामकाजासाठी शासकीय वाहनाचा उपयोग करण्यासाठी संपूर्ण बंदी करण्याबाबत कार्यवाही करण्यात आली आहे. तसेच निवडणूक जाहिर झाल्यानंतर सार्वजनिक निधीच्या खर्चांवर जाहिरात करण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या जाहिराती तात्काळ बंद करण्याच्या सूचनाही देण्यात आलेल्या आहेत.

शासकीय संकेतस्थळावरुन राजकीय कार्यकर्त्यांचे फोटो तात्काळ काढून टाकण्याबाबत सर्व संबंधित विभागांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. दारु, रोकड, प्रतिबंधीत औषधे यांची सखोल तपासणी राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे करण्यात येणार आहे, तसेच तक्रार देखरेख यंत्रणा कार्यान्वीत करण्यात येणार आहे. निवडणूक विषयक प्रमुख घडामोंडीची जाहिरात करण्यात येणार असून जाहिराती आकाशवाणी, टीव्ही, सिनेमागृहे, शासकीय वाहिन्या यांच्यावरुन मतदार शिक्षण साम्रगीचे प्रसार करण्यात येणार आहे, असल्याचेही जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्वेता सिंघल यांनी यावेळी सांगितले.

आचार संहिता काळात असे असणार नियम

निवडणूक काळात आचार संहितेचे काटेकोर पालन करण्याचे आदेश असून उल्लंघन करणा-यांवर कठोर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी सांगितले आहे. निवडणूक प्रचार काळात रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत प्रचारासाठी ध्वनीक्षेपकावर बंदी घालण्यात आली आहे. तर पर्यावरण पुरक प्रचार साहित्य व माध्यमांचा उपयोग करण्याचे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी केले आहे.

संवेदनशील मतदार संघांवर व्हिडीओग्राफी, सीसी टीव्ही आणि वेबकास्टींग करण्यात येणार आहे. प्रसार माध्यमांमधून आचार संहितेचे उल्लंघन रोखण्यासाठी जिल्हास्तरावर माध्यम प्रमाणपत्र नियंत्रण केंद्र उभारण्यात येणार आहे.

सोशल मिडीयाद्वारे प्रचारासाठी प्रमाणपत्राची आवश्यकता

निवडणूक काळात प्रसारमाध्यमांवरून चुकीची माहिती प्रसारित होऊ नये व अफवांना आळा घालण्यासाठी निवडणूक आयोगाने महत्वाचे पाऊल उचलेले आहे. त्यानुसार राजकीय पक्षांना फेसबुक, ट्वीटर, युटयूब, व्हाट्सअप आदी सोशल मिडीयाच्या माध्यमातून प्रचार साहित्य प्रसारित करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून गठीत करण्यात आलेल्या सोशल मिडीया प्रमाणपत्र नियंत्रण केंद्राचे प्रमाणपत्र घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. असे प्रमाणपत्र नसल्यास सोशल मिडीयावरून प्रचारास बंदी असून, नियमांचे उल्लंघन करणा-यांवर कठोर कार्यवाही करण्यात येणार आहे.


https://www.youtube.com/embed/