NEWS & EVENTS

सातारा जिल्हा

भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदासाठी नाशिक येथे छात्रपुर्व प्रशिक्षण

80mahanews-logo-min.jpg

सातारा, दि.१५- भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेवारांना सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड या परीक्षेची पूर्व तयारी करुन घेणेसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड नाशिक येथे महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुवतींसाठी दि. 19 ते 28मार्च 2019 या कालावधीत SSB कोर्स क्र. 49 आयोजित करण्यात येत आहे. या कोर्ससाठी प्रशिक्षणाची नि:शुल्क सोय करण्यात आली आहे.

तरी सातारा जिल्ह्यातील इच्दुक उमेदवारांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय,सातारा येथे दि. 15 मार्च 2019 रोजी मुलाखतीस हजर रहावे. मुलाखतीस येण्याआधी PCTC Training च्या Google plus पेज वरती किंवा जिल्हा सैनिक कल्याण विभाग,पुणे यांची वेबसाईट www.mahasainik.com वरील Recruitment Tab ला क्लीक करुन त्यामधील उपलब्ध Check List आणि महत्वाच्या तारखा ('lmportant Dates') यांचे अवलोकन करुन त्याची दोन प्रतीमध्ये प्रिंट काढून तसेच त्यामध्ये दिलेले सर्व परिशिष्ट डाऊन लोड करुन त्यांची ही दोन प्रतीमध्ये काढुन ते पुर्ण भरुन आणावेत.
अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व. प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड,नाशिक यांच्या दूरध्वनी क्र. 0253-2451031 व 2451032 वर संपर्क करावा. असे आवाहन रा.रा. जाधव जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.


https://www.youtube.com/embed/