NEWS & EVENTS

राजकीय

सुप्रिया सुळे एक लाखांपेक्षा अधिक मतांनी पराभूत होतील; संजय काकडेंचे नवे भाकीत

70sanjay-kakade.jpg

पुणे, दि.27- बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळेंचा एक लाखांपेक्षा अधिक मतांनी पराभव होईल, असे भाकीत भाजपा-शिवसेना महायुतीचे पश्चिम महाराष्ट्राचे प्रचारप्रमुख संजय काकडे यांनी केले आहे. पुण्याच्या महापालिका निवडणुकीदरम्यान भाजपा सत्तेत येईल असे भाकीत काकडेंनी केले होते, ते खरेही ठरले होते. त्यामुळे आता सुप्रिया सुळेंबाबत त्यांनी केलेले हे भाकीत कितपत खरे ठरते हे पाहणे उत्सुक्याचे असेल.

पुणे लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांनी खासदार संजय काकडे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यमाशी संवाद साधताना राज्यातील निवडणुकीबाबत त्यांनी आपली भुमिका मांडली. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत गेल्या निवडणुकीपेक्षा भाजपाच्या अधिक जागा निवडून येतील. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि बारामतीसह सर्व दहा जागांवर महायुतीचेच उमेदवार निवडून येतील, असा विश्वासही काकडे यांनी यावेळी व्यक्त केला.

काकडे म्हणाले, बारामती लोकसभा मतदार संघातही भाजपाच्या उमेदवारासाठी अनुकूल वातावरण आहे. बारामती वगळता खडकवासला, भोर, पुरंदर, दौंड मतदारसंघातून भाजपाला आघाडी मिळेल. यामुळे किमान एक लाखांपेक्षा अधिक मतांनी सुळेंचा पराभव होईल, असे काही आकडेवारींच्या आधारे त्यांनी भाकीत केले आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पश्चिम महाराष्ट्राच्या प्रचाराची जबाबदारी माझ्यावर सोपविली आहे. आतापर्यंत महापालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीवेळी जी जबाबदारी माझ्यावर सोपविली, ती मी पूर्ण क्षमतेने पार पाडली. त्यामुळे पुणे लोकसभेतही मी प्रचार करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

बापट आणि माझ्यात मतभेद नाहीत – संजय काकडे

पुण्यासह बारामती आणि संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात मी भाजप-शिवसेना महायुतीच्या उमेदवारांचा प्रचाराचे नियोजन करणार आहे. गिरीश बापट आणि माझ्यात आता मतभेद राहिलेले नाहीत. प्रत्येक निवडणुकीत उमेदवारीसाठी अनेक जम इच्छूक असतात. तसा मी देखील होते. मात्र, एकदा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सर्वांनी पक्षाचे काम करायचे असते या प्रोटोकॉलप्रमाणे मी काम करणार आहे.