NEWS & EVENTS

सातारा जिल्हा

स्मार्ट सिटीच्या स्वप्नातून शहरवासियांची क्रूर चेष्टा - डॉ. येळगावकर

78yelgavker.jpg

वडूज , दि.७ विधानसभा निवडणूकीनंतर वडूज शहराला स्मार्ट सिटी बनविण्याच्या वल्गना करून व शहरवासियांना स्मार्ट सिटीचे रंजक स्वप्न दाखवून शहरातील नागरिकांची क्रूर चेष्टा केली गेली ही खेदाची बाब असल्याचे माजी आमदार डॉ. दिलीपराव येळगावकर यांनी सांगितले. वडूज नगरपंचायतीचे बांधकाम सभापती वचनशेठ शहा यांच्या प्रभाग क्रमांक चौदामध्ये सुमारे ५५ लाख रूपये खर्चाच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात डॉ. येळगावकर बोलत होते. व्यासपीठावर ज्येष्ठ नेते चंद्रकांत काळे, भाजपाचे तालुकाध्यक्ष विकल्पशेठ शहा, नियोजन सभापती अनिल माळी, महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती सौ. किशोरी पटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ.येळगावकर म्हणाले, केंद्र व राज्यातील भारतीय जनता पक्षाने रस्ते,आरोग्य, पाणी अशा मूलभूत नागरी सुविधांना प्राधान्य देत विविध विकासकामे मोठ्या गतीने मार्गी लावली आहेत.गेल्या काही दशकांच्या कालावधीत व सद्याच्या सरकारच्या अल्पावधीत झालेली ही विकासकामे लोकांच्या विश्वासाला पात्र ठरली आहेत, त्यामुळे भाजपकडूनच विकासकामे गतीने मार्गी लागू शकतात असा जनतेत विश्वास निर्माण झाला आहे. विधानसभा निवडणूकीनंतर काही लोकांनी वडूज शहरातील नागरिकांना स्मार्ट सिटीचे स्वप्न दाखवून शहरवासियांची क्रर चेष्टा केली. नगरपंचायतीमध्ये भाजपाचे तीन नगरसेवक असतानाही आपण शहराच्या विकासासाठी कोणताही पक्षीय भेदभाव न ठेवता कटीबद्ध राहीलो आहोत. राज्य शासनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला जात आहे. मात्र आपल्या विकासकामांचे श्रेय विरोधकांकडून घेतले जात आहे. विकल्पशेठ शहा म्हणाले, डॉ. येळगावकर यांच्या माध्यमातून शहरातील विकासकामांसाठी मंत्रालय स्तरावर सातत्याने पाठपुरावा करून ती मार्गी लावली जात आहेत. शहराच्या विकासासाठीकोणताही पक्षपातीपणा ठेवला जाणार नाही. शहराच्या विकासासाठी आगामी काळात आणखी मोठ्या प्रमाणावर निधी मिळविला जाईल.


https://www.youtube.com/embed/