NEWS & EVENTS

राजकीय

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाई पोलीसांचे संचलन

69wai-police.jpg

वाई, दि.२८- लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वलभूमीवर आज शहरामध्ये पोलीसांनी संचलन केले. उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आनंद खोबरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमरसिंह निंबाळकर व 55 कर्मचारी संचलनात सहभागी झाले होते.लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वनभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नष निर्माण होऊ नये सर्वत्र शांतता राखण्यात यावी यासाठी पोलीस ठाण्याच्यावतीने शहरातून पोलीस संचलन करण्यात आले.

या संचलनात वाई, पाचगणी, महाबळेश्वार, मेढा व भुईंज येथील पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.पोलीस ठाण्यापासून सुरू झालेले संचलन किसनवीर चौक, जामा मशिद, चावडी चौक, नगरपालिका, गंगापुरी, महागणपती मंदिर मार्गे पुन्हा पोलीस ठाणे असे करण्यात आले.