NEWS & EVENTS

सातारा जिल्हा

वाई शहराचा सर्वांगीण विकास हा उद्देश, पक्ष भूमिका महत्त्वाची - मंत्री मकरंद पाटील

10WhatsApp-Image-2025-11-19-at-23-35-27.jpeg

वाई- वाई नगरपालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी ठरविताना पक्षाने योग्य उमेदवारांच्या शोधात मोठी मेहनत घेतली. या प्रक्रियेत काही तांत्रिक कारणांमुळे अडीच वाजेपर्यंत उशीर झाला, कारण विरोधकांकडून योग्य उमेदवार मिळत नसल्याने परिस्थिती सतत बदलत होती, अशी माहिती मंत्री मकरंद पाटील यांनी दिली  पाटील म्हणाले, आम्ही वाई शहराला सुशिक्षित सक्षम आणि समाजाभिमुख उमेदवार द्यायचे ठरवले. सामाजिक सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रात काम केलेले अनेक अनुभवी चेहरे आम्ही पुढे आणले. काही माजी नगरसेवक, माजी नगराध्यक्ष, नवीन तरुण प्रतिनिधी तसेच दोन डॉक्टरा महिलांचा  समावेश करून आम्ही मजबूत पॅनेल उभे केले आहे 


 ते पुढे म्हणाले की, वाई शहराचा सर्वांगीण विकास हा आमचा एकमेव उद्देश आहे. बहुमतासाठी २४ पैकी २४ जागा मिळाव्यात यासाठी कार्यकर्त्यांनी निःस्वार्थ योगदान दिले. भारतदादा आणि नारायण आबांनी त्यांनीही नगराध्यक्ष पदासाठी योग्य प्रचार सुरू केला होता परंतु सर्व पदाधिकारी यांच्या निर्णयाने डॉक्टर नितीन कदम यांना उमेदवारी देण्याचे निश्चित करण्यात आले  . अनेक कार्यकर्त्यांनी शहराच्या विकासासाठी सातत्याने काम केले असून काहींना या वेळेस थांबावे लागले. पुढील निवडणुकांमध्ये किंवा इतर संधींमध्ये त्यांना योग्य स्थान दिले जाईल. मागील निवडणुकीतील पराभवाची आठवण करून देताना पाटील म्हणाले ३१ हजार मतांमध्ये एका मताने नगराध्यक्ष पद गमवावे लागले. त्यामुळे यावेळी मतदारांशी मनापासून संपर्क साधणे अत्यावश्यक आहे. नम्रपणे नमस्कार करा, त्यांचे प्रश्न ऐका. उमेदवारांनीही विनम्रता जपली पाहिजे. पक्षाची भूमिका, शिस्त आणि विकासाचा मार्ग यांना सर्वांत जास्त महत्त्व आहे.
शेवटी पाटील यांनी सर्व उमेदवारांना संदेश देताना सांगितले की, आपण वाई शहराला केवळ निवडणूक नव्हे, तर पुढील पाच वर्षांची विकासात्मक दिशा देण्यासाठी उतरले आहोत. विकास, शिस्त आणि जनसंपर्क या तीन गोष्टींवर भर द्यावा असे प्रतिपादन मंत्री मकरंद पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रचाराच्या नारळ फोडण्याच्या कार्यक्रमाप्रसंगी केले गंगापुरी येथील काळभैरवनाथ मंदिरात मध्ये वाई शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित दादा पवार गटाचे  नगराध्यक्ष पदाचे उमेदवार व नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार या ठिकाणी उपस्थित होते व वाईतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात मध्ये गंगापुरी येथे हजर होते
     प्रभाग क्रमांक 9 आ अ मध्ये मकरंद पाटील यांच्या समर्थक राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार गटाच्या उमेदवार या बिनविरोध निवडून आल्यामुळे त्याबद्दल मंत्री नामदार मकरंद पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी डॉक्टर प्राध्यापक नितीन कदम संजय लोळे प्रतापराव पवार सचिन फरांदे आधी उपस्थित होते  व या निवडीसाठी योगदान दिलेले युगल घाडगे व बापूराव खरात यांचा मंत्री मकरंद पाटील यांनी हार श्रीफळ देऊन सन्मान केला