NEWS & EVENTS

राजकीय

सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या धोरणांमुळे जनतेवर उपासमारीची वेळ - खासदार उदयनराजे

66satara-photo.jpg

,सातारादि.22- केंद्रातील सरकार अयशस्वी असून, सत्ताधाऱ्यांचे निर्णय, राबिवलेली धोरणे यामुळे जनतेवर उपासमारीची वेळ आली असल्याची टीका खा.उदयनराजे भोसले यांनी येथील आयोजित बैठकीत केली. २४ मार्च रोजी कराड येथील प्रचार सभेच्या नियोजनाची बैठक कॉंग्रेस कमिटीत आयोजित करण्यात आली होती. यावेळी आ. आनंदराव पाटील, धैर्यशील कदम, विजयराव कणसे, किशोर बाचल, बाबासाहेब कदम, बाळासाहेब बागवान, अजितराव पाटील, निवास थोरात, भीमराव पाटील, अविनाश फाळके, सुनील काटकर, संग्राम बर्गे, रजनी पवार, नम्रता उत्तेकर, धनश्री महाडिक यांची प्रमुख उपस्थितीत होती.

खा.उदयनराजे भोसले पुढे म्हणाले, सातारा जिल्ह्याची आगळीवेगळी परंपरा असून, या जिल्ह्यात अनेक चळवळी जन्माला आल्या आहेत. येणाऱ्या निवडणुकीत परिवर्तनाची चळवळ हि गांभीर्याने घेतली पाहिजे. केवळ मलाच मताधिक्याने निवडून न देता आघाडीचे सर्व उमेदवार निवडून दिले गेले पाहिजे. सत्ताधाऱ्यांचे निर्णय, राबिवलेली धोरणे, बंद अवस्थेत असलेले कारखाने, बांधकाम क्षेत्रातील चुकीच्या नियमांमुळे रोजगारांवर आलेली उपासमारीची वेळ, जीएसटीमुळे व्यापाऱ्यांची दयनीय अवस्था. या सर्व निर्णयांचा सरकारला पश्चाताप होत आहे. मात्र हे निर्णय त्यांना मागे देखील घेता येत नाही. केंद्रातील सरकार अयशस्वी ठरले असून यशस्वी सरकार आणण्यासाठी परिवर्तन घडले पाहिजे. देशाला पूर्वपरिस्थिती प्राप्त करून देण्यासाठी सत्ता बदल गरजेची असल्याचे खा.उदयनराजे म्हणाले.