NEWS & EVENTS

राजकीय

पुनर्वसनाच्या प्रक्रियेमध्ये कोणावर अन्याय होणार नाही

खा.उदयनराजेंचे कास समितीला आश्‍वासन

60udyanraje.jpg

सातारा, दि. ७ – प्रकल्पग्रस्तांसाठी गावठाणांच्या सर्व अठरा सुविधा या तातडीने पुरविल्या जातील. पुनर्वसनाच्या प्रक्रियेमध्ये कोणावर अन्याय होणार नाही असे स्पष्ट आश्‍वासन खासदार उदयनराजे भोसले यांनी कास धरण पुनर्वसन कृती समितीच्या सदस्यांना बुधवारी दिले. कास गावातील प्रकल्प बाधितांची बैठक येथील शासकीय विश्रामगृहात दुपारी एक वाजता पार पडली. यावेळी महावितरण व जलसंपदा विभागाचे अधिकारी अधीक्षक अभियंता एस एस घोगरे, उपअभियंता आय एस मोमीन, शाखा अभियंता धुळेकर, सातारा पालिकेचे पाणी पुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर उपस्थित होते.

कास धरण उंचीच्या कामामुळे कास गावठातील काही कुटुंबांचे पुनर्वसन करावयाचे आहे. कास गावठाणासाठी अठरा प्रकारच्या सुविधा, गावातील देवीच्या मंदिराचे पुर्नबांधकाम तसेच धरणात जाणाऱ्या जमिनींची नुकसानभरपाई, सातारा ते कास रस्त्याचे जुन्या सर्वे नं 121 मधूनच नोंदणी मूल्यांकन रहावे अशा विविध मागण्या या वेळी चर्चेच्या दरम्यान समोर आल्या. आटाळी ते कास दरम्यान जे वीज खांब आहेत ते तातडीने हटवण्याचे आश्‍वासन घोगरे यांनी देत नवीन फीडर यंत्रणेची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या. पुनर्वसन प्रक्रियेचा संपूर्ण आढावा मी स्वतः घेणार आहे. यामध्ये कोणावरही अन्याय होणार नाही, सर्वांच्या मागण्या पूर्ण केल्या जातील असे स्पष्ट आश्‍वासन खासदार उदयनराजे भोसले यांनी बोलताना दिले.
सातारा – प्रकल्पग्रस्तांसाठी गावठाणांच्या सर्व अठरा सुविधा या तातडीने पुरविल्या जातील. पुनर्वसनाच्या प्रक्रियेमध्ये कोणावर अन्याय होणार नाही असे स्पष्ट आश्‍वासन खासदार उदयनराजे भोसले यांनी कास धरण पुनर्वसन कृती समितीच्या सदस्यांना बुधवारी दिले. कास गावातील प्रकल्प बाधितांची बैठक येथील शासकीय विश्रामगृहात दुपारी एक वाजता पार पडली. यावेळी महावितरण व जलसंपदा विभागाचे अधिकारी अधीक्षक अभियंता एस एस घोगरे, उपअभियंता आय एस मोमीन, शाखा अभियंता धुळेकर, सातारा पालिकेचे पाणी पुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर उपस्थित होते.

कास धरण उंचीच्या कामामुळे कास गावठातील काही कुटुंबांचे पुनर्वसन करावयाचे आहे. कास गावठाणासाठी अठरा प्रकारच्या सुविधा, गावातील देवीच्या मंदिराचे पुर्नबांधकाम तसेच धरणात जाणाऱ्या जमिनींची नुकसानभरपाई, सातारा ते कास रस्त्याचे जुन्या सर्वे नं 121 मधूनच नोंदणी मूल्यांकन रहावे अशा विविध मागण्या या वेळी चर्चेच्या दरम्यान समोर आल्या. आटाळी ते कास दरम्यान जे वीज खांब आहेत ते तातडीने हटवण्याचे आश्‍वासन घोगरे यांनी देत नवीन फीडर यंत्रणेची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या. पुनर्वसन प्रक्रियेचा संपूर्ण आढावा मी स्वतः घेणार आहे. यामध्ये कोणावरही अन्याय होणार नाही, सर्वांच्या मागण्या पूर्ण केल्या जातील असे स्पष्ट आश्‍वासन खासदार उदयनराजे भोसले यांनी बोलताना दिले.

- दैनिक प्रभातवरुन

https://www.youtube.com/embed/