NEWS & EVENTS

सातारा जिल्हा

सातारा केमिस्ट पतसंस्थेचे स्वमालकीच्या जागेत स्थलांतर

नवीन कार्यालयाचे शनिवारी उद्घाटन

50mahanews-logo-min.jpg

सातारा, दि. ७ - सातारा केमिस्ट नागरी सह. पतसंस्था मर्यादित या पतसंस्थेच्या नूतन कार्यालयाचे स्वमालकीच्या जागेत शनिवार दि. ९ मार्च रोजी सकाळी ११ वाजता उद्घाटन होत आहे. या आनंदाच्या क्षणी सातारकर नागरिकांनी उत्स्फूर्तपणे उपस्थित रहावे, असे आवाहन केमिस्ट पतसंस्थेचे चेअरमन अभय गरगटे व व्हाईस चेअरमन मुकुंद लोहिया यांनी आज सातारा येथील पत्रकार परिषदेत केले. यावेळी अखिल भारतीय केमिस्ट संघटनेच्या अध्यक्षपदी जगन्नाथराव शिंदे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा संघटनेच्यावतीने जाहीर सत्कार करण्यात येणार आहे.

सातारा नागरी केमिस्ट सह.पतसंस्थेला सातारा पतसंस्था फेडरेशनच्यावतीने गतवर्षी उत्कृष्ट पतसंस्थेचा पुरस्कार मिळाला होता. लेखा परिक्षणात अ वर्ग प्राप्त करणार्‍या या पतसंस्थेने १५ टक्के लाभांश सभासदांना दिला आहे. अवघ्या १२ तासांत कागदपत्रांच्या पूर्ततेनंतर सुलभ कर्जपुरवठा तसेच वीज बिल भरणा केंद्र व इतर सुविधा या पतसंस्थेत निर्माण करण्यात आल्या आहेत. पोवई नाका येथील रामकृष्ण कॉलनीतील घोडके प्लाझा अपार्टमेंटमधील जागेत सध्या स्वमालकीचे पतसंस्थेचे कार्यालय होत आहे. विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते उद्घाटन होणार्‍या या कार्यक्रमाला संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथराव शिंदे, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष प्रविण पाटील, सागर पाटील व नगराध्यक्षा माधवी कदम व मान्यवर उपस्थित राहणार आहेत. पतसंस्थेचे सर्व संचालक, मार्गदर्शक, सल्लागार समिती सदस्य तसेच व्यवस्थापक बाळकृष्ण साबळे यांनी कार्यक्रमाची जय्यत तयारी केली असून केमिस्ट नागरी पतसंस्थेच्या इतिहासात सुवर्णाक्षराने या सोहळ्याची नोंद होईल, त्याचे आम्ही साक्षीदार राहणार आहोत याचा अभिमान वाटत असल्याची भावना दिलीप गांधी, प्रकाश आंबेकर, नंदकुमार बेंद्रे, दिलीप दोशी यांनी व्यक्त केली आहे.


https://www.youtube.com/embed/