NEWS & EVENTS

सातारा जिल्हा

पाचगणीत अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी दोन महिलांनी घेतली माघार

लक्ष्मी कऱ्हाडकर यांनी एका प्रभागातून घेतली माघारी

98pachgni-pailka.jpg

वाई / प्रतिनिधी

पाचगणी नगरपालिका निवडणुकीत आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी दोन महत्त्वाच्या महिला उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतली. प्र. क्र.७ अ मधून तसेच प्रभाग ४ मधून दुहेरी उमेदवारी दाखल करणाऱ्या बोधे नम्रता विवेक यांनी अखेर प्रभाग ७ अ मधील अर्ज मागे घेतला आहे. दुसरीकडे, प्र. क्र.८ ब मधून तसेच प्रभाग ७ मधून अर्ज दाखल केलेल्या कऱ्हाडकर लक्ष्मी राजेंद्र यांनी प्रभाग 8 ब मधील अर्ज मागे घेतला.विशेष म्हणजे, वेगवेगळ्या प्रभागांमधून किंवा दोन प्रकारचे अर्ज दाखल केल्याने नियमांनुसार त्यांना एकच अर्ज ठेवणे बंधनकारक होते. त्यामुळे या उमेदवारांनी एक अर्ज मागे घेत दुसरा अर्ज कायम ठेवण्याचा निर्णय घेतला.

 

याआधी प्रभाग २ अ मधील उमेदवार रेणुका श्रीकांत कांबळे यांनी ही अर्ज मागे घेतला आहे. एकूण तीन उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने निवडणुकीच चित्र स्प्ष्ट झाले आहे.दुहेरी उमेदवारीमुळे निर्माण झालेल्या गोंधळाला पूर्णविराम देण्यासाठी आणि मुख्य लढत कोणत्या प्रभागातून द्यायची याबाबत स्पष्ट भूमिका घेण्यासाठी दोघींनीही आपला एकेक अर्ज मागे घेतल्याची माहिती राजकीय वर्तुळातून समोर आली आहे.

या बदलामुळे प्रभाग ७, प्रभाग ८ ब आणी प्रभाग २अ मधील निवडणूक चित्रात नवे समीकरण निर्माण झाले असून पुढील लढत अधिक सरळ व स्पष्ट होण्याची शक्यता आहे. मतदारांचे लक्ष आता या दोन्ही प्रभागातील नव्या मुकाबल्याकडे वळले आहे. अर्ज मागे घेतल्यानंतर अनेक प्रभागांतील लढती अधिक सरळ, तर काही ठिकाणी तितक्याच चुरशीच्या झाल्या असून अंतिम प्रतिस्पर्धी कोण असणार याचेही चित्र स्पष्ट होऊ लागले आहे. अंतिम सूची जाहीर झाल्यानंतर आता सर्वांचे लक्ष प्रचारमोहीमेच्या जोरदार सुरुवातीवर आहे.