NEWS & EVENTS

सातारा जिल्हा

मतदान जागृती करणाऱ्या मुलांचे उदयनराजेंकडून कौतुक

71udyanraje-vote-.jpg

सातारा -  लोकसभा निवडणुकीसाठी सात मे रोजी मतदान होणार आहे. साताऱ्यातील रयत शिक्षण संस्थेच्या आप्पासाहेब पाटील इंग्लिश मीडियम स्कूलचे विद्यार्थी पोवई नाक्यावर हातामध्ये फलक घेऊन मतदान करण्याचे लोकांना आवाहन करत होते. या विद्यार्थ्यांची भेट घेऊन खासदार उदयनराजे भोसले यांनी त्यांचे कौतुक केले. तसेच त्यांच्यासोबत छायाचित्र देखील काढले.