NEWS & EVENTS

राजकीय

खासदार उदयनराजेंची जोशी व मोहिते यांच्या निवासस्थानी भेट

51raje.jpg

वाठार, दि. 22 – रेठरे बुद्रुक, ता. कराड येथे भारती विद्यापीठाचे उपाध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते यांची खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सदिच्छा भेट घेऊन होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा केली. दरम्यान कराड अर्बन कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी यांच्याही निवासस्थानी भेट देऊन त्यांच्याशी निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा केली.

सातारा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून उमेदवारी निश्‍चित झाल्यामुळे गत काही दिवसांपासून खा. छत्रपती उदयनराजे भोसले यांनी कराड दक्षिणमधील नेतेमंडळींच्या गाठीभेटी घेऊन निवडणुकीसाठी पाठिंबा मिळविण्याचा कार्यक्रम सुरू केला आहे. याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्राचे ज्येष्ठ विचारवंत स्व. यशवंतराव मोहिते यांच्या रेठरे बुद्रुक येथील निवास्थानी डॉ. इंद्रजित मोहिते यांची सदिच्छा भेट घेतली.

यावेळी माजी सरपंच पै. बबन तात्या दमामे यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. यावेळी कराडचे नगरसेवक राजेंद्र यादव, विजय यादव, राहुल खराडे, प्रमोद पाटील- आटकेकर, मारुती निकम, सुनील बाकले, मदन माने, आबा सूर्यवंशी, दिलीप तावरे, सनी मोहिते, गणेश गरुड, जयवंत पाटील, मनोहर थोरात, अल्लाउदीन मुल्ला, लक्ष प्रतिष्ठानचे अध्यक्ष धनंजय मोहिते उपस्थित होते. कराड अर्बन कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी यांच्या यांच्या निवासस्थानी दिलेल्या भेटीप्रसंगी नगरसेवक अुतल शिंदे, सुनील काटकर, चंद्रकांत पाटील, सुधीर एकांडे व इतर मान्यवर उपस्थित होते.