सातारा - सातारा लोकसभा मतदार संघातील कोरेगांव तालुक्यातील राष्ट्रीय काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षांच्या प्रमुख कार्यकर्त्यांसह श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचेवर प्रेम करणार्या प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा स्वरूप महत्वाची बैठक गीताई मंगल कार्यालाय, कोरेगांव येथे मंगळवार दि. १२ मार्च २०१९ रोजी ठिक दुपारी ४.०० वाजता आयोजित करण्यात आलेली आहे.
बैठकीस खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचेसह कोरेगांवचे आमदार शशिकांत शिंदे, राष्ट्रीय कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष विजयराव कणसे ,राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजीतसिंह नाईक-निंबाळकर,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनिल माने, राष्ट्रीय काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षांचे प्रमुख मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
या मेळावा स्वरूप बैठकीस उपस्थित रहावे असे आवाहन श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे वतीने जिल्हापरिषद माजी सभापती सुनील काटकर यांनी केले आहे.


