NEWS & EVENTS

राजकीय

कराडच्या विकास कामासाठी नेहमी उपलब्ध- उदयनराजे

घरी जावून उदयनराजे यांनी घेतल्या नगरसेवकांच्या गाटीभेटी

44udyanraje-karad.jpg

कराड, दि.२९- कराडच्या विकास कामासाठी नेहमीच तुम्हाला थेट उपलब्ध राहीन, अशी ग्वाही कॉग्रेस-राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार व खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली. पालिकेतील लोकशाही आघाडीच्या नगरसेवकांच्या घरी जावून खासदार उदयनराजे यांनी गाटीभेटी घेतल्या. त्यावेळी त्यांनी नगरसेवकांशीही संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

लोकशाही आघाडीचे नेते जयंत पाटील, सौरभ पाटील नगरसेविका सौ. पल्लवी पवार, सुनंदा शिंदे, वैभव हिंगमीरे, मोहसीन आंबेकरी यांच्या घरी जावून त्यांनी भेटी घेतल्या. त्यानंतर खासदार उदयनराजे यांनी येथील मंगळवार पेठेतील येथील कार्यालयातही भेट दिली. ज्येष्ठ नेते पी. डी. पाटील यांच्या समाधीस्थळी जावून आदरांजली वाहिली. मंगळवार पेठेतील ज्योतीबा मंदीरातही दर्शन घेतले. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लोकांनी स्वागत केले. त्यानंतर खासदार उदयनराजे यांनी लोकशाही आघाडीच्या नगरसेवकांशी संवाद साधला. येथील लोकशाही आघाडीच्या कार्यालयात संवादाचा कार्यक्रम झाला. यावेळी पाटील यांच्यासह सुहास, पवार, पोपटराव पवार, शिवाजी पवार हींगमीरे, आंबेकरी, उपस्थित होते. यावेळी लोकशाही आघाडीतर्फे सौरभ पाटील यांनी खासदार उदयनराजे यांचे स्वागत केले.

खासदार उदयनराजे म्हणाले, लोकांना आवश्यक वाटणारा विकास करण्यासाटी नेहमीच कटीबद्ध आहे. विकासाच्या कल्पना सुचवा. त्या पूर्ण करण्यासाठी नेहमीच सर्वांसाठी यापुढे थेट उपलब्ध राहीन. कऱ्हाड वाढते आहे, त्याच्या व्यापक वाढीचा विचार करून विकासाच्या कल्पान राबवण्याचा विचार आङे. तुम्हाला सगळ्यांना विचारात घेवून विकासाच्या कल्पना आखल्या जातील.

यावेळी सौरभ पाटील म्हणाले, ज्येष्ठ नेते पी. डी. पाटील यांच्या दूरजृष्टीतून कऱ्हाडचा विकास झाला आहे. त्या विकासाला साजेशे काम करण्यासाठी लोकशाही नेहमीच आग्रही आहे. कऱ्हाडचा स्वच्छतेत पहिला क्रमांक आला आहे. यापुढेही अशाच स्वरूपाचे काम करण्यासाटी आम्ही प्रयत्नशील राहू, त्यात आपल्या सारख्या लोकप्रिय खासदारांची साथ मिळणार आहेच. आगामी निवडणुकीतही आपल्याला जास्तीत जास्त मताधिक्क कऱ्हाडमधून देण्यासाठी आम्ही कटीबद्द राहू.