NEWS & EVENTS

Entertainment

शाहरूखच्या पार्टीत भीतीमुळे लपून बसले होते विकी, तापसी आणि राजकुमार

विकीनी त्या दिवशी काय घडलं याचा किस्सा सांगितला आहे.

20bollywood.jpg

शाहरूखच्या दिवाळी पार्टीत नेहमीच बॉलिवूडमधल्या बड्या कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळते. या पार्टीसाठी संपूर्ण बॉलिवूड शाहरुखच्या ‘मन्नत’मध्ये जमतं. बॉलिवूडमध्ये सर्वात मोठी असलेली शाहरूखची पार्टी मात्र अभिनेता विकी कौशलसाठी एक वाईट अनुभव देणारीच होती. शाहरुखच्या पार्टीत तेव्हा काय घडलं होतं याचा मजेशीर किस्सा विकीनं नुकताच सांगितला.

एका वर्षी शाहरूखच्या वाढदिवसानंतर दिवाळी आली होती. शाहरूखनं वाढदिवसाचं आणि दिवाळीचं सेलिब्रेशन एकत्र करण्याचं ठरवलं यासाठी त्यानं संपूर्ण बॉलिवूडला आमंत्रण पाठवलं. वाढदिवसानिमित्त डिनर पार्टी ठेवली असल्याचं सांगत विकीनं सर्व कलाकारांना आमंत्रणं पाठवली. यात विकी, राजकुमार राव आणि तापसी या तिघांचा समावेश होता. त्यानंतर पुढे काय घडलं याचा किस्सा विकीनं सांगितला.

‘हा एक औपचारिक डिनर असल्याचं वाटून मी अत्यंत साध्या वेशात शाहरूखच्या घरी गेलो. शाहरूखच्या घरी पोहोचल्यानंतर बॉलिवूडमधले अनेक कलाकार तिथे पार्टीसाठी आले असल्याचं मला दिसलं. करिना, मलायका तर भरजरी भारतीय पेहरावात तिथे वावरत होते. मी, तापसी आणि राजकुमार हे तिघं सोडले तर सर्वचजण अशाच पेहरावात आले होते. आम्हा तिघांनाही संकोचल्यासारखं वाटू लागलं. आपण चुकीचा ड्रेस कोड फॉलो केल्याचं आमच्या लक्षात आलं. कोणीही आम्हाला पाहू नये म्हणून भीतीनं आम्ही कोपऱ्यात लपून राहिलो. कोणाच्याही नजरेस आम्ही पडू नये अशी प्रार्थनाच आम्ही करत होतो’ असं म्हणत विकीनं शाहरूखच्या पार्टीत आलेला अनुभव एका मुलाखतीत सांगितला.