NEWS & EVENTS

देश-विदेश

नीरव मोदी लंडनमध्ये

नीरव मोदी लंडनमधील एका आलीशान अपार्टमेंटमध्ये मजेने राहात असल्याचे स्पष्ट झाले

66nirav-modi-660-030919084504.jpg

पंजाब नॅशनल बँकेचे १४ हजार कोटी रुपये घेऊन देशाबाहेर पळून गेलेला हिरे व्यापारी नीरव मोदी याला सरकार शोधत असताना, तो लंडनमधील वेस्ट एंड भागातील एका आलिशान अपार्टमेंटमध्ये उघडपणे आणि मजेने राहात असल्याचे स्पष्ट झाले आहे. लंडनमधील 'द टेलीग्राफ' या वृत्तपत्राचा प्रतिनिधी मिक ब्राउन याने मोदीला शोधून काढले आहे. ब्राउनने मोदीला अनेक प्रश्न विचारले, मात्र त्याने कोणत्याही प्रश्नाचे उत्तर दिले नाही.

ब्राउन याने मोदीवर असलेल्या कर्जाबाबत प्रश्न विचारले, मात्र मोदीने 'नो कॉमेंट्स' असे उत्तर दिले. ज्याचे आपण पैसे घेतले ते तुम्हाला शोधत आहेत असेही ब्राउन याने मोदीला विचारले. त्यावरही मोदी 'नो कॉमेंट्स' असेच उत्तर दिले.

तुम्ही लंडनमध्ये किती दिवस राहणार, या प्रश्नाचेही मोदीने उत्तर दिले नाही. आपण राजकीय शरण येण्यास इच्छूक असून तसा अर्ज केल्याचे मला अधिकाऱ्यानी सांगितले आहे आणि आपल्या प्रत्यर्पणाचे प्रयत्नही सुरू आहेत, मग आपल्याला वाटते का की, तुमचे प्रत्यर्पण व्हायला हवे असा प्रश्नही ब्राउनने विचारला. मात्र या प्रश्नाचेही मोदीने 'नो कॉमेट्स' असेच उत्तर दिले. आपण सर्वच प्रश्नांवर मौन का धारण करत आहात असेही ब्राउन याने विचारले. मात्र यावर मोदीने मौनच धारण केले.


https://www.youtube.com/embed/