NEWS & EVENTS

Entertainment

हृतिकला भिडणार टायगर; हॉलिवूडला टक्कर देणारा जबरदस्त टीझर

ज्या क्षेत्राचा मी बादशहा आहे तिथे तू आताच सुरुवात केली आहेस,' असं हृतिकने टायगरला म्हटलं आहे.

10war-.jpg

जबरदस्त अॅक्शन, शरीरयष्टी, आणि अफलातून डान्ससाठी ओळखले जाणारे दोन अभिनेते आगामी ‘यशराज फिल्म्स’च्या चित्रपटात एकत्र झळकणार आहेत. विशेष म्हणजे हे दोघे एकमेकांना भिडणार आहेत. अभिनेता हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांच्यामधील ऑनस्क्रीन टक्कर पाहणं प्रेक्षकांसाठी पर्वणीच ठरणार आहे. ‘वॉर’ असं या चित्रपटाचं नाव असून त्याचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. एखाद्या हॉलिवूड चित्रपटाला टक्कर देणारा हा टीझर आहे.

‘तुझ्या अॅक्शनमध्ये थोडी कमतरता आहे, ते नीट कसं करतात हे मी तुला शिकवतो,’ असं म्हणत टायगरने टीझर शेअर केला. तर याला हृतिकनेही तोडीस तोड उत्तर दिलं आहे. ‘ज्या क्षेत्राचा मी बादशहा आहे त्या क्षेत्रात तू आताच सुरुवात केली आहेस, थोडा वेळ आराम कर,’ असं हृतिकने म्हटलं आहे. ५३ सेकंदांच्या या टीझरमध्ये अफलातून साहसदृश्य पाहायला मिळतात. यामध्ये अभिनेत्री वाणी कपूरचा बिकीनी अंदाजसुद्धा पाहायला मिळतो.

या चित्रपटासाठी हृतिकने टायगरच्या अभिनयाचे कौतुक केले आहे. माझ्यासोबत काम करण्यासाठी आणि विरोधी भूमिकेसाठी केवळ टायगर श्रॉफच योग्य असल्याचं हृतिकने एका मुलाखतीत म्हटलं होतं. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित हा चित्रपट २ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे.


https://www.youtube.com/watch?time_continue=16&v=XkHV7ROmIVA