NEWS & EVENTS

Featured Posts

२०२५-३० मध्ये देशात पिण्याच्या पाण्याची टंचाई

612waterdrop-20.jpg

कोल्हापूर, दि.15- - पिण्याची पाण्याची धोक्‍याची घंटा आता पुन्हा वाजली आहे. २०२५-३० दरम्यान कोल्हापूर, महाराष्ट्र नव्हे, तर देशपातळीवर पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर होण्याची शक्‍यता आहे. याबाबतचा अहवाल ‘युनायटेड नेशन’ने प्रसिद्ध केला आहे. अहवालानुसार जगभरातील पिण्याच्या पाण्यापैकी केवळ चार टक्के वापर भारतात होतो.

एकंदरीतच समस्या गंभीर होत असल्याने जनजागृतीसाठी आर्किटेक्‍ट ॲण्ड इंजिनिअर्स असोसिएशनने पुढाकार घेतला आहे. ‘जगवा पंचगंगा’ या मोहिमेंतर्गत देशपातळीवरील तज्ज्ञांना कोल्हापुरात आणून या समस्येवर उपाययोजना करण्यात येणार आहेत.

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, युनायटेड नेशनने २००० मध्ये पाण्यासंदर्भात सर्व्हे करून अहवाल तयार केला होता. तेंव्हा प्रत्येक देशांना काही सूचना दिल्या होत्या. साधारण २०१५ मध्ये त्यांनी पुन्हा एकदा याचा आढावा घेतला. तेंव्हा भारत देशालाही पिण्याच्या पाण्याची वस्तुस्थिती दर्शविली.

जगभरातील पिण्याच्या पाण्यापैकी १७ टक्के पाणी भारतात आहे. भारतात साधारण २०२५ ते ३० दरम्यान पिण्याच्या पाण्याची टंचाई होऊ शकते. त्यामुळे उरलेल्या साधारण पाच ते दहा वर्षांत यावर ठोस उपाय करणे आवश्‍यक असल्याचे सांगण्यात आले आहे. याची गंभीर दखल आर्किटेक्‍ट ॲण्ड इंजिनिअरिंग असोसिएशनने घेतली आहे. जयंती नाल्यापासून ते जगवा पंचगंगा मोहिमेपर्यंत त्यांनी स्वतः पुढाकार घेतला आहे.

उन्हाळा वाढू लागला की पिण्याच्या पाण्याबरोबरच टंचाईवर चर्चा होते. झाडे लावा झाडे जगवाच्या आठवणींना उजाळा मिळतो. मात्र ठोस उपाय होत नाही. म्हणूनच आर्किटेक्‍ट ॲण्ड इंजिनिअरिंग असोसिएशनने शिवाजी विद्यापीठाबरोबर कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.


https://www.youtube.com/embed/