NEWS & EVENTS

राजकीय

सातारा मतदार संघातील जनता परीवर्तन घडविणारच- बानुगडे पाटील

29narendra-mshwar.jpg

महाबळेश्‍वर, २७- शिवसेना भाजपा यांची युती होवु नये यासाठी आघाडीने देव पाण्यात बुडविले होते. जेव्हा युती जाहीर झाली त्यावेळी निवडणुक लढण्याची भाषा करणार्‍या अनेक रथी महारथी यांनी शेपुट घातले. आघाडी पुन्हा देश लुटायला सज्ज झाली असती. काँग्रेस आघाडीला पुन्हा सत्ता मिळू नये म्हणूनच युती करण्याचा निर्णय आम्ही घेतला. सातारा लोकसभा मतदार संघातील जनता परीवर्तन घडविणारच आहे. असा विश्‍वास शिवसेनेचे उपनेते प्रा. नितीन बानुगडे पाटील यांनी व्यक्त केला.

शिवसेना भाजपा यांच्या सह घटकपक्षांच्या महायुतीचे सातारा लोकसभा मतदार संघाचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या प्रचारासाठी वाई, महाबळेश्‍वर, खंडाळा विधानसभा मतदार संघातील महायुतीच्या पदाधिकारी यांचा संयुक्त मेळावा आयोजित केला होता. त्या मेळाव्यात सातारा,सांगली जिल्हा संपर्क प्रमुख प्रा. नितिन बानुगडे पाटील हे बोलत होते. पुढे बोलताना खा. शरद पवार यांच्या निवडणुक लढविणार असल्याच्या घोषणा करून पुन्हा माघार घेतली. त्यांना पराभव दिसू लागला म्हणूनच त्यांनी माघार घेतली असा आरोप बानुगडे पाटील यांनी केला. ही निवडणुक आहे देशाचे पुढील पाच वर्षांचे भवितव्य ठरविणारी ही निवडणुक आहे. गल्लीतील ऑर्केस्ट् नाही. कि तेथे कॉलर उडवायची आणि सिनेमातील डायलॉग मारायचे. इंदिरा गांधी यांनी पुर्वी गरीबी हटाव ही घोषणा दिली होती. आता पुन्हा तीच घोषणा त्यांचे नातु राहुल गांधी देत आहेत. मग 50 वर्षे तुम्ही काय करत होता, असा सवाल प्रा नितीन बानुगडे पाटील यांनी केला.

युतीचे उमेदवार नरेंद्र पाटील म्हणाले, आपल्या जिल्हयातील प्रश्‍न
लोकसभेत मांडुन ते सोडविण्याचे काम विद्यमान खासदार करतात का? असा प्रश्‍न शिवसेना भाजपा महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी आपल्या भाषणात उपस्थित केला. युवकांना रोजगार मिळावा या साठी काही प्रयत्न झाले का पदवी पर्यंत शिक्षण घेवुन आज आपल्या जिल्हयातील अनेक युवक मुंबईत माथाडी कामगार म्हणुन जीवन जगत आहे. जिल्ह्यात सर्वच स्तरातून खासदारांविरोधी मोठा रोष आहे. हा सर्व मतपेटीतुन बाहेर पडुन जिल्हयात परीवर्तन घडल्या शिवाय राहणार नाही. जिल्हयात हिंदुराव निंबाळकर यांच्या रूपाने शिवसेनेचे खासदार निवडुन आले होते. तसेच सदाशिव सपकाळ हे आमदार झाले होते. या विजयात माथाडी कामगारांची भ्ाुमिका महत्वाची होती. सर्व माथाडी कामगार एकवटला होता. आता पुन्हा त्याची पुर्नरावृत्ती घडुन पुन्हा सातारा जिल्हयात महायुतीचा उमेदवार विजयाी झाल्या शिवाय राहणार नाही, असा विश्‍वास नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केला. महाबळेश्‍वर पर्यटन स्थळाच्या विकासात राष्ट्रवादीचे खासदार यांचे काहीच योगदान नाही. आजही अनेक गावांना गावठान नाही. त्यामुळे अनेक समस्या स्थानिक लोकांना सहन कराव्या लागत आहेत. विविध झोन आघाडी शासनाने या तालुक्यावर लादले व येथील ग्रामिण भागातील लोकांचे जीवन जगणे मुश्किल झाले आहे. तालुक्याला झोन मुक्त करण्या साठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.