NEWS & EVENTS

सातारा जिल्हा

स्व. यशवंतराव चव्हाण यांना मान्यवरांचे अभिवादन

24karad5.jpg

कराड, दि. 13– आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या 106 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या येथील प्रीति संगमावरील समाधीस्थळाचे दर्शन घेऊन मान्यवरांनी अभिवादन केले. माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, खा. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, ना. शेखर चरेगावकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरिकांनी पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले.

आ. बाळासाहेब पाटील, आ. आनंदराव पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, कराडच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, मलकापूरच्या नगराध्या नीलिमा येडगे, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, जिल्हा परिषद सदस्य ऍड. उदयसिंह पाटील-उंडाळकर, जिल्हा परिषद सदस्य सुनील काटकर, मानसिंगराव जगदाळे, राष्ट्रवादीचे वसंतराव मानकुमरे, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख नरेंद्र पाटील, उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, जनशक्‍तीचे गटनेते राजेंद्रसिंह यादव, बांधकाम सभापती हणमंतराव पवार, नियोजन सभापती विजय वाटेगावकर, कराड पंचायत समितीच्या सभापती फरिदा इनामदार, उपसभापती सुहास बोराटे, माजी सभापती शालन माळी, बाळू ढेकणे, युवा नेते शिवराज मोरे, अजित पाटील-चिखलीकर, जिल्हा परिषद सदस्य निवासराव थोरात, माजी नगरसेवक घन:श्‍याम पेंढारकर, मुकुंद चरेगावकर, युवा नेते विजयसिंह यादव, भाजपाचे कराड शहराध्यक्ष एकनाथ बागडी, गजानन आवळकर, इंद्रजित चव्हाण, किसनराव पाटील-घोणशीकर, प्रकाशबापू पाटील, रुपेश कुंभार, वनिता गोरे, सुरेखा जाधव, राजेंद्र माने, दिलीप चव्हाण, रेश्‍मा कोरे, एस. ए. डांगे, संजय जगदाळे, सत्यजित बडे, संतोष धोत्रे, भास्कराव कुलकर्णी, रामभाऊ कणसे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, नागरिक, यशवंतप्रेमी आदींनी स्व. चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेऊन अभिवादन केले. दरम्यान शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी शब्द-सुमनांची आदरांजली वाहिली. शहरातील प्राथमिक व माध्यमिक शाळांचे विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते.


https://www.youtube.com/embed/