NEWS & EVENTS

राजकीय

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण लवकरच भाडिपाच्या मंचावर

या लोकमंच्यावर ते त्यांचा राजकीय प्रवास ते २०१९च्या लोकसभा निवडणूक याविषयी चर्चा करणार आहेत.

66Prithviraj-Chavan-1.jpg

मुंबई, दि.5- सुसंस्कृत नेता अशी स्वतंत्र ओळख निर्माण करणारे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण लवकरच भाडिपा ‘लोकमंचा’वर उपस्थित राहणार आहेत. या लोकमंच्यावर ते त्यांचा राजकीय प्रवास ते २०१९ च्या लोकसभा निवडणूक यांविषयी चर्चा करणार आहेत.

पृथ्वीराज चव्हाण यांना त्यांच्या घरातूनच राजकारणाचं बाळकडू मिळालं. त्यामुळे राजकीय वर्तुळात वावर कसा असावा हे त्यांना उत्तमरित्या ठावूक आहे. स्वच्छ प्रतिमा आणि उत्तम प्रशासन कौशल्यामुळे मुख्यमंत्री म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या कार्याचा चांगला ठसा उमटविला होता. अभ्यासू वृत्तीने व प्रदीर्घ प्रशासकीय अनुभवाने लोकहिताचे अनेक चांगले निर्णय घेत पृथ्वीराज चव्हाण यांनी राजकारणापलीकडे जात जनतेमध्ये आपली स्वत:ची एक वेगळी प्रतिमा तयार केली आहे. त्यांचा हाच राजकीय प्रवास ते भाडिपाच्या लोकमंचावर उलगडणार आहेत.

राजकीय वाटचालीसोबतच ते सध्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा दृष्टीकोन, येत्या निवडणुकीविषयी तसेच त्यांच्या राजकीय वाटचालीविषयी चर्चा करणार आहेत. मंगळवार ९ एप्रिल रोजी मराठी साहित्य संघ, गिरगांव, येथे सायंकाळी ६.वा. अभिनेता सारंग साठ्ये यांच्यासोबत हा संवाद रंगणार आहे.
‘लोकमंच’ या उपक्रमांतर्गत भाडिपाच्या ‘विषय खोल’ या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून जनतेच्या भेटीला येणाऱ्या पृथ्वीराज चव्हाण यांचे विविध विषयांवरील अभ्यासपूर्ण विचार या संवादाच्या निमित्ताने जाणून घेता येणार आहेत.