NEWS & EVENTS

Entertainment

‘FaceApp Challenge आम्ही दशकापूर्वीच केलंय’, ‘यशराज’चा व्हिडिओ व्हायरल

'म्हातारपण देगा देवा' म्हणत सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकजण FaceApp चॅलेंज स्वीकारत आहेत.

522019-07-19.jpg

सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून FaceApp ची फार क्रेझ पाहायला मिळतेय. म्हातारपणी आपण कसं दिसू या उत्सुकतेपोटी सेलिब्रिटीसुद्धा या FaceApp चॅलेंज स्वीकारत फोटो पोस्ट करत आहेत. अशातच ‘यशराज फिल्म्स’चा एक व्हिडीओ चर्चेत आला आहे. ‘FaceApp Challenge आम्ही सर्वांत आधी केलंय’, असं म्हणत यशराजच्या अधिकृत अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

‘यशराज फिल्म्स’ने शेअर केलेला हा व्हिडीओ शाहरुख खान, प्रिती झिंटा यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘वीर झारा’ या चित्रपटातील आहे. या चित्रपटात शाहरुख व प्रिती यांनी म्हातारपणाचीही भूमिका साकारली होती. या दोघांचा म्हातारपणातील व्हिडीओ शेअर करत ‘यशराज फिल्म्स’ने गंमत केली आहे.

भारतात हे तर खूप आधीपासूनच केलं गेलं, अशा मजेशीर प्रतिक्रिया या व्हिडीओवर आल्या आहेत. FaceApp ची भुरळ सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांना पडली आहे. हे अॅप जितकं ट्रेण्ड होतंय तितकंच त्याच्या प्रायव्हसी पॉलिसीविषयी चर्चा होत आहे. हे अॅप युजरची खासगी माहिती तर काढून घेत नाही ना असा सवाल उपस्थित केला जात आहे.